कामेरीत मास्क, सॅनिटायझरचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:25 IST2021-05-15T04:25:07+5:302021-05-15T04:25:07+5:30

कामेरी (ता. वाळवा) येथे शुभम पाटील व संग्राम पाटील यांनी आरोग्य केंद्रात डॉ. नितीन चिवटे व डॉ. किरण माने ...

Distribution of masks, sanitizers in the room | कामेरीत मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कामेरीत मास्क, सॅनिटायझरचे वाटप

कामेरी (ता. वाळवा) येथे शुभम पाटील व संग्राम पाटील यांनी आरोग्य केंद्रात डॉ. नितीन चिवटे व डॉ. किरण माने यांच्याकडे मास्क व सॅनिटायझर सुपुर्द केले.

लोकमत न्यूज नेटवर्क

कामेरी : कामेरी (ता. वाळवा) येथील रायगड ग्रंथालयाच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त संस्थापक शुभम पाटील यांच्या वतीने कामेरी ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र व पोलीस कर्मचारी यांना मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

स्वत:च्या सुरक्षेसाठी अपुरी साधने असताना गेले १५ ते १८ महिने कोरोना जंतुसंसर्ग रोखण्यासाठी सतत प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मदतीची गरज विचारात घेऊन हे वाटप करण्यात आले. यावेळी बंडाकाका पाटील, संग्राम पाटील, योगेश पाटील, किरण नांगरे, अशोक कुंभार, दिनेश जाधव, डॉ. नितीन चिवटे, डॉ. किरण माने, आरोग्य सहायक व्ही. एस. कोरे, संजय पाटील उपस्थित होते.

Web Title: Distribution of masks, sanitizers in the room