म्हैसाळ : येथील ग्रामपंचायत सदस्य पुष्पराज केदारराव शिंदे-म्हैसाळकर यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा करण्यात आला. वाढदिवसानिमित्त आरोग्य कर्मचारी अशा वर्कर व अंगणवाडीसेविका यांना भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. भारती बँकेचे संचालक जितेश कदम यांच्या हस्ते या भेटवस्तूंचे वाटप झाले.
जितेश कदम यांनी कोविड सेंटरमधील रुग्णांशी व सेंटरमध्ये सेवा देणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. यावेळी काहींनी औषधांचा पुरवठा होत नसल्याबद्दल तक्रारी केली. कदम यांनी तत्काळ आरोग्य अधिकाऱ्यांशी चर्चा करून औषध पुरवठा करण्यासंबंधी सूचना केल्या.
कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, मोहनराव शिंदे साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर, दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी केदारराव शिंदे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी मसाजी कांबळे, एस.बी. पाटील, धनराज शिंदे, अलकादेवी शिंदे, रामदास कोरवी, भैया गायकवाड, भरत कबुरे, अनिल कबुरे उपस्थित होते.