कपलिंग तुटल्याने मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

By Admin | Updated: January 16, 2015 23:44 IST2015-01-16T23:15:15+5:302015-01-16T23:44:44+5:30

सुमारे दोन तासाच्या विलंबाने कोल्हापूर-मिरज मार्गावरील वाहतूक सुरळीत

Disruption of coupling caused traffic disruption on the Miraj railway route | कपलिंग तुटल्याने मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

कपलिंग तुटल्याने मिरज रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

मिरज : मिरज ते कोल्हापूर जाणाऱ्या मालगाडीचे डबे जोडणारे कपलिंग तुटल्याने मालगाडीचे डबे जयसिंगपूर स्थानकातच राहिले. कोयना एक्स्प्रेस, हैदराबाद एक्स्प्रेस, सातारा-कोल्हापूर पॅसेंजरला दोन तास विलंब झाला. आज, शुक्रवारी सकाळी मिरजेतून कोल्हापूरला माल भरण्यासाठी जात असलेल्या गाडीच्या डब्यांचे कपलिंग तुटल्याने सहा डबे जयसिंगपूर स्थानकातच राहिले. पुढे गेलेल्या मालगाडीच्या चालकास याची सूचना देऊन ती परत आणली. डबे जोडण्यासाठी सुरू असलेल्या गोंधळामुळे कोल्हापूरला जाणारी सातारा-कोल्हापूर पॅसेंजर जयसिंगपूर स्थानकातच थांबविली, तर कोल्हापुरातून येणाऱ्या कोयना आणि कोल्हापूर-हैदराबाद एक्स्प्रेस हातकणंगले स्थानकात थांबविल्या. या मालगाडीचे डबे जोडण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर सुमारे दोन तासाच्या विलंबाने कोल्हापूर-मिरज मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.
(वार्ताहर)

Web Title: Disruption of coupling caused traffic disruption on the Miraj railway route