शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

'तंटामुक्त' समितीवरुन वाद, भांडण सोडविण्यास गेलेल्या उपसरपंचाला मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2019 22:45 IST

तालुक्यातील शिरवणे-भेकरेवाडी येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता तंटामुक्त समितीची बैठक

दापोली : वाडीची भांडी परत न दिल्याने गावातील ग्रामस्थाला बेदम मारहाण करण्यात येत होती. त्यावेळी मध्यस्थी करण्यासाठी गेलेले उपसरपंच विनायक सोनू पाष्टे यांना महात्मा गांधी तंटामुक्त समितीची सभा रद्द केल्याच्या रागातून गावातील टोळक्याने बेदम मारहाण केल्याची घटना दापोली तालुक्यातील शिरवली गावात रविवारी सायंकाळी घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

तालुक्यातील शिरवणे-भेकरेवाडी येथे रविवारी सायंकाळी 4 वाजता तंटामुक्त समितीची बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी काही मुंबईकरदेखील उपस्थित होते. मात्र, आज रविवार असल्याने सुटीच्या दिवशी ग्रामपंचायतीमध्ये तंटामुक्तीची बैठक घेण्याला उपसरपंच विनायक पाष्टे यांनी विरोध केला. त्यानंतर आजची सभा रद्द होऊन 19 डिसेंबरला ही बैठक पुन्हा लावण्याचे सर्वानुमते ठरले.सभा रद्द झाल्यानंतर सर्वजण संतोष कापले यांच्या घरी गेले. संतोष कापले यांनी 11 नोव्हेंबर रोजी वाडीची भांडी लग्नाकरिता नेली होती. मात्र, त्यांनी भांडी परत न केल्याने काही लोकांनी संतोष कापले यांना जाब विचारला. यावेळी जमलेल्या ग्रामस्थांमध्ये बाचाबाची होऊन काहीजणांनी कापले यांना धक्काबुक्की करायला सुरुवात केली. त्याचवेळी ‘त्यांना मारू नका,’ असे म्हणत उपसरपंच विनायक पाष्टे मध्यस्थी करायला गेले. त्यावेळी सभा रद्द झाल्याचा राग मनात धरून काहीजणांनी पाष्टे यांनाच मारहाण केली. त्यांना वाचविण्यासाठी आलेल्या पत्नीलाही धक्काबुक्की करण्यात आल्याची फिर्याद विनायक पाष्टे यांनी पोलीस स्थानकात दिली आहे. 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीsarpanchसरपंचCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस