शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत बंडखोरांशी जवळीक दिगंबर जाधव यांना भोवली, भाजपने युवक जिल्हाध्यक्ष पदावरून हटवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 19:03 IST

मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांना साथ देणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष ...

मिरज : मिरजेत पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या विरोधात भाजप बंडखोर मोहन वनखंडे यांना साथ देणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दिगंबर जाधव यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी राज कबाडे यांची निवड करण्यात आली आहे.लोकसभा निवडणुकीत भाजप मिरजेत पिछाडीवर गेला आहे. त्यातच विधानसभा निवडणुकीपूर्वी पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय मोहन वनखंडे यांनी बंडखोरी केल्याने यावेळी विधानसभा निवडणूक भाजपसाठी आव्हानात्मक आहे. मिरजेत चौथ्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेल्या सुरेश खाडे यांच्याविरोधात आघाडी उघडणारे मोहन वनखंडे यांना मिरजेत महाविकास आघाडी उमेदवारी देणार असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर सुरेश खाडे यांना आव्हान देणाऱ्या वनखंडे यांच्यासोबत असलेल्या माजी नगरसेविका शांता जाधव यांचे पुत्र व युवा मोर्चाचे दिगंबर जाधव यांना पदावरून हटविण्यात आले आहे. शहरातील काही माजी नगरसेवकांनी खाडे यांना पाठिंबा जाहीर केला. मात्र, वनखंडे समर्थक भाजपच्या माजी नगरसेविका शांता जाधव या भाजप बंडखोरासोबत असल्याने ही कारवाई अपेक्षित होती. महाआघाडीत प्रवेश करणारे वनखंडे यांनी काँग्रेसचा मेळावा घेऊन त्यांच्या भाजपमधील समर्थकांचा काँग्रेस प्रवेश होणार असल्याचे जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपमधील वनखंडे समर्थकांना शोधून पदावरून हटविण्यात येत आहे.

भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्षपदी राज कबाडे व युवती मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी शोभाताई तोडकर यांची निवड करून पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दोघांना निवडीचे पत्र दिले. पालकमंत्र्यांशी लढत देण्यासाठी वनखंडे महाविकास आघाडीत गेल्याने त्यांच्याशी जवळीक असलेल्या जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते पालकमंत्र्यांशी पुन्हा जुळवून घेण्याच्या मार्गावर आहेत.मी अजून पक्षातचकाँग्रेसशी जवळीक साधणाऱ्या दिगंबर जाधव यांना पदावरून हटविले तरी मी अजून पक्षातच असल्याचे त्यांनी सांगितले. मी व युवा मोर्चाचे इतर पदाधिकारी वनखंडे यांच्या मेळाव्यात काँग्रेस प्रवेश करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजBJPभाजपाvidhan sabhaविधानसभा