येडेनिपाणीतील दिलीप हांडे यांच्या लघुचित्रपटास अमेरिकेतून नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:25+5:302021-05-01T04:25:25+5:30

शिराळा : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील दिलीप हांडे यांच्या ‘खाँहिशे’ या हिंदी लघुचित्रपटास अमेरिका ...

Dilip Hande's short film in Yedenipani nominated from USA | येडेनिपाणीतील दिलीप हांडे यांच्या लघुचित्रपटास अमेरिकेतून नामांकन

येडेनिपाणीतील दिलीप हांडे यांच्या लघुचित्रपटास अमेरिकेतून नामांकन

शिराळा : येडेनिपाणी (ता. वाळवा) येथील दिलीप हांडे यांच्या ‘खाँहिशे’ या हिंदी लघुचित्रपटास अमेरिका येथील न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाले आहे. त्यामुळे हांडे यांनी लघुचित्रपट निर्मिती पाहिले पाऊल टाकून सांगली जिल्ह्याचा झेंडा अटकेपार फडकावला आहे.

दिलीप हांडे हे मूळचे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील येडेनिपाणी येथील आहेत. ते नोकरी व व्यवसायामुळे मुंबईत स्थायिक झाले आहेत. त्यांनी ‘खाँहिशे’ या पहिल्याच हिंदी लघुचित्रपटाची निर्मिती केली आहे. ग्रामीण भागातील मराठी माणसाने पहिल्यांदा हिंदीमध्ये निर्मिती केलेल्या लघुपटास अमेरिकेतील न्यूयॉर्क फिल्म फेस्टिव्हलमध्ये नामांकन मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या लघुपटात नीतू पांडे व गुलशन पांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत तर सहकलाकार प्रवीण जाधव यांची भूमिका आहेत. हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या व्यथा मांडणारा आहे. त्याचे दिग्दर्शन संदीप शांताराम सुर्वे, कॅमेरामन म्हणून जय तरी तर संकलन प्रज्ञा पाटील, कलादिग्दर्शक म्हणून राहुल जीवन यांनी काम पाहिले आहे. या लघुपट निर्मितीसाठी आशा दिलीप हांडे यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.

दिलीप हांडे व प्रवीण जाधव यांनी आता ‘केकताड’ या चित्रपटाची निर्मिती केली असून त्याचे विटा व शिराळा तालुक्यातील विविध ठिकाणी चित्रिकरण पूर्ण झाले आहे. त्यात स्थानिक लोकांना अभिनय करण्याची संधी मिळाली आहे.

Web Title: Dilip Hande's short film in Yedenipani nominated from USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.