शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
3
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
4
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
5
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
6
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
7
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
8
India's T20 World Cup Squad Press Conference - शिवम दुबेची निवड का केली? रोहित शर्माने कारण सांगितलं, पण प्लेइंग इलेव्हनबाबत मोठं विधान 
9
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
10
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
11
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
12
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
13
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
14
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
15
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
16
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
17
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
18
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
19
चेन्नईतील श्रीदेवीचं आलिशान घर! जिथे जान्हवीचं गेलं बालपण, आता राहता येणार रेन्टवर
20
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास

मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी धीरज पाटीलला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 1:55 PM

मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले.

ठळक मुद्देव्हिसा फसवणूक : मुख्य सूत्रधार पुण्यात सापडलाआज न्यायालयात हजर करणारसंशयितांची संख्या वाढणार!

सांगली : मलेशियात नोकरीच्या आमिषाने सुशिक्षित बेरोजगार तरुणांना गंडा घातल्याप्रकरणी अटकेत असलेला पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याचा फरारी साथीदार धीरज बाळासाहेब पाटील (वय २८, रा. पाटणे प्लॉट, हरिपूर रस्ता, सांगली) यास अटक करण्यात शहर पोलिसांना रविवारी दुपारी यश आले.गेल्या आठवड्यात धीरज पाटील व कौस्तुभ पवार दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होता. कौस्तुभला चार दिवसांपूर्वी अटक केली आहे. सध्या तो पोलिस कोठडीत आहे. धीरज पाटील हा गुंगारा देत फरारी होता. नातेवाईकांच्या चौकशीत तो मलेशियात असल्याची माहिती मिळाली होती. त्यामुळे त्याचा शोध थांबला होता.

तो पुणे जिल्ह्यातील सप्तश्रृंगी येथे आश्रयाला असल्याची माहिती शहर पोलिसांना शनिवारी मिळताच पोलिस पथक तातडीने रवाना झाले होते. रविवारी दुपारी तो सापडला. त्याला घेऊन सायंकाळी पथक सांगलीत दाखल झाले. त्यास सोमवारी दुपारी जिल्हा न्यायालयात उभे केले जाणार आहे.संशयित कौस्तुभ पवार व त्याचा मित्र धीरज पाटील या दोघांनी मलेशियात चांगल्या पगाराच्या नोकरीचे आमिष दाखवून गुरुनाथ कुंभार (रा. शिरवळ, जि. सोलापूर), मोहन शिंदे (बेलवंडी, जि. अहमदनगर), दीपक माने (मानेवाडी, जि. सोलापूर) व सदानंद धनगर (जळगाव) या चौघांकडून पाच ते सहा लाख रुपये घेतले. मलेशियात गेल्यानंतर या तरुणांना हॉटेलमध्ये वेटरची नोकरी मिळाली.वर्किंग व्हिसा नसल्याने मलेशिया पोलिसांनी या तरुणांना अटक केली होती. चारही तरुणांना न्यायालयाने तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सध्या हे तरुण शिक्षा भोगत आहेत.व्हिसा फसवणूक प्रकरणाचा मास्टरमार्इंड धीरज पाटील हाच असल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून पुढे आली होती. काही महिन्यांपूर्वी धीरज पाटील हा स्वत: मलेशियात नोकरीसाठी गेला होता. तिथे परदेशी तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणाऱ्या काही व्यक्तींशी त्याची ओळख झाली.

तेथून भारतात परतल्यानंतर त्याने थेट मलेशियामध्ये रोजगार देण्याचा व्यवसायच सुरू केला. त्याचा हा व्यवसाय अनेक दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू होता. मात्र या फसवणूक प्रकरणामुळे तो उघडकीस आला. कौस्तुभ पवार हा त्याच्याकडे बेरोजगार तरुण घेऊन जात असे. या बदल्यात कौस्तुभला तो कमिशन देत होता.संशयितांची संख्या वाढणार!मुख्य सूत्रधार धीरज पाटील याला अटक झाल्याने आणखी कोणाचा सहभाग आहे का, हे स्पष्ट होईल. मलेशियात तो कोणाच्या माध्यमातून तरुणांना नोकरी लावत होता, याचा उलगडा होईल, असे तपास अधिकारी पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले. ते म्हणाले, धीरजसह कौस्तुभ पवारचे बँक खाते गोठविले आहे. तरुणांची फसवणूक करुन त्यांनी मिळविलेल्या पैशाचे नेमके काय केले? याचाही उलगडा यावेळी केला जाईल.

 

टॅग्स :Sangliसांगलीpassportपासपोर्ट