जिल्ह्यात धनगर समाजाचे आंदोलन

By Admin | Updated: July 31, 2014 00:05 IST2014-07-31T00:02:04+5:302014-07-31T00:05:44+5:30

सांगलीत मोर्चा : इस्लामपुरात गुरुवारी बंदची हाक; लांडगेवाडी फाट्यावर रास्ता रोको

Dhangar community movement in the district | जिल्ह्यात धनगर समाजाचे आंदोलन

जिल्ह्यात धनगर समाजाचे आंदोलन

इस्लामपूर/शिरढोण/आष्टा/कडेगाव : बुधवारी धनगर समाजबांधवांनी मेंढरांच्या कळपासह ‘जय मल्हार’च्या गजरात इस्लामपूर तहसील कार्यालयावर धडक मारली. आरक्षण व सवलतींसाठी अत्यंत आक्रमक झालेल्या धनगर समाजाने आघाडी सरकारला हिसका दाखविण्याचा इशारा दिला. दरम्यान, या मागणीसाठी उद्या (गुरुवारी) इस्लामपूर बंदची हाक देण्यात आली आहे. शिरढोण येथे रास्ता रोको, आष्टा, कडेगाव येथे मोर्चा काढून शासनाचा निषेध केला.
धनगर समाज आरक्षण कृती समितीतर्फे माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व अमित मलगुंडे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. मोर्च्यात महिला—मुलींसह समाजबांधवांची मोठी उपस्थिती होती. पेठ—सांगली राज्यमार्गावर ठिय्या मारत दोन तास आंदोलन चालले. मोर्चाला भाजप, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना, काँग्रेस, मराठा महासंघ व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शवला.
सुनील मलगुंडे, अमित मलगुंडे, बापू बिरु वाटेगावकर, चंद्रशेखर तांदळे, प्रदीप गावडे, श्रध्दा करे, अजित हराळे, विजय जाधव यांची भाषणे झाली. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बी. के. पाटील यांनी धनगर समाजाच्या मागणीला पाठिंबा दिला.
यावेळी काँग्रेसचे जितेंद्र पाटील, राजेंद्र शिंदे, अ‍ॅड. आर. आर. पाटील, विजय पवार, स्वाभिमानीचे बी. जी. पाटील, सयाजी मोरे यांच्यासह अशोकराव वीरकर, संभाजी कचरे, नगरसेविका शुभांगी शेळके, शालन कोळेकर, पं. स. सदस्या रेखा कोळेकर, कविता ताटे उपस्थित होते.
शिरढोण : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मिरज—पंढरपूर रस्त्यावर लांडगेवाडी फाटा येथे आज (बुधवार) दुपारी एकच्या सुमारास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यामुळे सुमारे तासभर वाहतूक ठप्प झाली होती. संघटनेचे राज्य प्रवक्ते महेश खराडे,तुकाराम मासाळ, बिरदेव बंडगर, सावंता पांढरे, अनिल पाटील, शरद शेळके, सचिन पाटील, अर्जुन थोरात, लक्ष्मण रनवरे, सूरज पाटील आदींची भाषणे झाली. आंदोलनात आबासाहेब ओलेकर, भाऊसाहेब दुधाळ, आशितोष शेजाळ, शिवाजी पाटील, दादासाहेब कोळेकर, प्रताप एडके यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते. (वार्ताहर)

Web Title: Dhangar community movement in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.