धामणीचा शिरीष सूर्यवंशी ‘बोस्टन श्री’चा मानकरी

By Admin | Updated: January 13, 2015 00:16 IST2015-01-12T22:18:49+5:302015-01-13T00:16:30+5:30

तो सिटी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून हॉटेल व्यावसायिक आहे

Dhamani's Shirish Suryavanshi honors Boston Shree | धामणीचा शिरीष सूर्यवंशी ‘बोस्टन श्री’चा मानकरी

धामणीचा शिरीष सूर्यवंशी ‘बोस्टन श्री’चा मानकरी

सांगली : बोस्टन व्यायामशाळेतर्फे आयोजित केलेल्या शरीरसौष्ठव स्पर्धेत इनाम धामणी (ता. मिरज)च्या शिरीष सूर्यवंशी याने ‘बोस्टन श्री २०१५’ किताब पटकावला. तो सिटी हायस्कूलचा माजी विद्यार्थी असून हॉटेल व्यावसायिक आहे. स्पर्धेचे उद्घाटन डॉ. यशवंत तोरो यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी राजेंद्र माळी होते. बक्षीस वितरण नगरसेवक संतोष पाटील, महेश भंडारे, दत्तात्रय घाडगे, आशिष यादव, उमाकांत पाटील, विनायक सोनवणे, आशिष अभ्यंकर व अभिजित कवठेकर यांच्या हस्ते झाले. डॉ. सुहास व्हटकर, रवींद्र आरते यांनी पंच म्हणून काम पाहीले. रियाज कुरणे यांनी संयोजन केले. यावेळी संतोष भोसले, अतुल माने, रवी पाटील, रियाज शेख, रवी शेट्टी, शब्बीर शेख, संतोष माळी, अतुल धोत्रे, ओंकार भस्मे उपस्थित होते.
स्पर्धेचा अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असा अंतिम निकाल : ५५ किलो : शाहरूख नदाफ, संजय सरवदे, साहील शेख. ६० किलो : आकाश बरकडे, तेजस माळी, उमेश घोरपडे. ६५ किलो : सगीर जमखंडीकर, शाहबाज सनदी, योगेश वारे. ७० किलो : शिरीष सूर्यवंशी, अझरूद्दीन मुजावर, प्राण सरवदे. ७० किलोवरील : अतुल माने, मंगेश चौगुले, दत्ता भोसले. बेस्ट पोझर : सगीर जमखंडीकर, मोस्ट इम्प्रुव्हड : अतुल माने. (क्रीडा प्रतिनिधी)

Web Title: Dhamani's Shirish Suryavanshi honors Boston Shree