पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग विकसित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:29 IST2021-09-12T04:29:57+5:302021-09-12T04:29:57+5:30

सांगली : जिल्ह्यातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणाऱ्या पाचवा मैल ते सांगली हा रस्ता रुंदीकरणासह ...

Develop the Sangli State Highway from the fifth mile | पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग विकसित करा

पाचवा मैल ते सांगली राज्यमार्ग विकसित करा

सांगली : जिल्ह्यातील कराड-तासगाव राष्ट्रीय महामार्ग व पेठ-सांगली-मिरज राष्ट्रीय महामार्ग यांना जोडणाऱ्या पाचवा मैल ते सांगली हा रस्ता रुंदीकरणासह विकसित करण्याची मागणी आमदार सुधीर गाडगीळ यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली.

गाडगीळ यांनी मुंबईत चव्हाण यांची भेट घेतली. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पलूस ते पाचवा मैल ते सांगली या प्रमुख राज्यमार्गामधील पाचवा मैल ते सांगली हा रस्ता राष्ट्रीय महामार्गातून वगळला गेला आहे. हा रस्ता अत्यंत रहदारीचा तसेच पलूस, कडेगाव, तासगाव या महत्वाच्या तालुक्यांना जोडणारा रस्ता आहे. अवजड वाहनांची मोठी वाहतूक या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात आहे. दोन महत्त्वाच्या रस्त्यांना जोडणाऱ्या हा साधारण १६ किलोमीटरचा रस्ता विकसित झाल्यास तासगाव, पलूस भागाची सांगली शहराशी संपर्क वाढणार आहे. जुना बुधगाव रस्ता येथे नवीन रेल्वे उड्डाणपुलाला मंजुरी द्यावी. जुना बुधगाव रस्ता महापालिका क्षेत्रातला असून यावर मोठी वाहतूक होत असते. महापुरामध्ये महापालिका क्षेत्रातील नागरिकांना उड्डाणपूल नसल्यामुळे स्थलांतरित होणे कठीण झाले होते. पूरस्थितीत स्थलांतर करणाची समस्या उड्डाणपुलामुळे कायमची दूर होईल. त्यामुळे यास मंजुरी मिळावी अशीही मागणी गाडगीळ यांनी केली आहे.

Web Title: Develop the Sangli State Highway from the fifth mile