देवराष्ट्रेत दोन युवकांवर बिबट्या गुरगुरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:33 IST2021-02-17T04:33:07+5:302021-02-17T04:33:07+5:30

घटनेची माहिती मिळताच सागरेश्वरच्या वनपाल हर्षदा कानकेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बिबट्या विलास महिंद याच्या ऊसाच्या शेतात पसार ...

In Devarashtra, a leopard growled at two young men | देवराष्ट्रेत दोन युवकांवर बिबट्या गुरगुरला

देवराष्ट्रेत दोन युवकांवर बिबट्या गुरगुरला

घटनेची माहिती मिळताच सागरेश्वरच्या वनपाल हर्षदा कानकेकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत बिबट्या विलास महिंद याच्या ऊसाच्या शेतात पसार झाला. घटनास्थळी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले आहेत. सोमवारी रात्री ताकारी योजनेच्या मोहिते वडगाव वितरिकेच्या रस्त्यावर बिबट्या बसला होता. शेतात निघालेल्या सुनील चव्हाण यांच्या मोटारसायकलचा प्रकाश पडताच तो अरण्याच्या कुंपणाकडे गेला; पण अरण्यात जाता येत नसल्याने तो परत फिरून मोटारसायकलस्वारांच्या दिशेने येऊन त्या युवकांवर गुरगुरला. यामुळे युवकांची भंबेरी उडाली. त्यांनी आपली कशीबशी सुटका करून घेत सागरेश्वर अभयारण्य प्रशासनाला पाचारण केले. तोपर्यंत बिबट्या उसाच्या शेतात शिरला होता. वनपाल हर्षदा कानकेकर, वनरक्षक शशिकला शेंडगे, दर्याधन सोनवने, मनोज मदने, प्राणीमित्र सुधीर थोरात यांनी बिबट्याच्या ठशांची पाहणी केली.

Web Title: In Devarashtra, a leopard growled at two young men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.