सांगली सीआयडीच्या उपअधीक्षक मुल्ला बनल्या ‘मिसेस इंडिया वुमन टुडे’
By शरद जाधव | Updated: September 22, 2022 20:17 IST2022-09-22T20:16:27+5:302022-09-22T20:17:14+5:30
याच स्पर्धेतील ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ यातही त्यांनी उपविजेतेपद पटकाविले.

सांगली सीआयडीच्या उपअधीक्षक मुल्ला बनल्या ‘मिसेस इंडिया वुमन टुडे’
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली: येथील राज्य गुप्तवार्ता विभाग अर्थात सीआयडीच्या उपअधीक्षक आरीफा मुल्ला यांनी थायलंड येथे झालेल्या सौंदर्य स्पर्धेत यश मिळवले. त्यांना ‘मिसेस इंडिया वुमन टुडे २०२२’ या किताबाने गौरविण्यात आले. याच स्पर्धेतील ‘बेस्ट पर्सनॅलिटी’ यातही त्यांनी उपविजेतेपद पटकाविले.
थायलंडमधील फुकेट शहरात मिस इंडिया आणि मिसेस इंडिया या स्पर्धा झाल्या. यासाठी देशभरातून ४२ स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. १६ ते २० सप्टेंबरदरम्यान या स्पर्धा झाल्या. मुल्ला यांची प्राथमिक फेरी पुणे येथे झाली होती. याच्या अंतिम फेरीत मुल्ला यांनी यश मिळवत मिसेस इंडिया वुमन टुडे हा किताब पटकाविला.