हिंगणगाव खुर्दच्या उपसरपंचपदी संदेश दंडवते बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:28 IST2021-03-23T04:28:58+5:302021-03-23T04:28:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संदेश आत्माराम दंडवते याची बिनविरोध निवड करण्यात ...

As the Deputy Panch of Hingangaon Khurd, the message is unopposed | हिंगणगाव खुर्दच्या उपसरपंचपदी संदेश दंडवते बिनविरोध

हिंगणगाव खुर्दच्या उपसरपंचपदी संदेश दंडवते बिनविरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी :

हिंगणगाव खुर्द (ता. कडेगाव) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी संदेश आत्माराम दंडवते याची बिनविरोध निवड करण्यात आली.

मावळत्या उपसरपंच सावित्री आनंदराव जाधव यांनी ठरल्याप्रमाणे पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे उपसरपंच पदाची जागा रिक्त होती.

त्यामुळे उपसरपंच निवडीसाठी सरपंच अशोक राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. यामध्ये संदेश आत्माराम दंडवते यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच संदेश दंडवते म्हणाले, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य व ग्रामस्थांनी माझ्यावर विश्वास ठेवून बिनविरोध उपसरपंच केले. त्यांच्या विश्वासास पात्र राहून येणाऱ्या काळात सरपंच व सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन गावाच्या विकासासाठी प्रयत्नशील राहू.

यावेळी वसंत शंकर साळुखे, अमोल बाजीराव गोसावी, सिद्धनाथ पांडुरंग जाधव, संभाजी तुकाराम वायदंडे आदी उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे ग्रामसेवक डी. ए. कोळी यांनी आभार मानले.

Web Title: As the Deputy Panch of Hingangaon Khurd, the message is unopposed