शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Politics: अजित पवारांचा दौरा अराजकीय, पण हालचाली राजकीयच

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2024 11:31 IST

काँग्रेस नेत्यांची भेट..भाजप नेत्यांकडून आदरातिथ्य

सांगली : राजकीय कार्यक्रमांवर फुली मारून केवळ अराजकीय कार्यक्रम स्वीकारत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेला सांगली जिल्हा दौरा छुप्या राजकीय हालचालींना जन्म देणारा ठरला. काँग्रेस नेत्यांच्या भेटीपासून भाजप नेत्यांच्या आदरातिथ्यापर्यंत त्यांच्या प्रत्येक घडामोडींमागे राजकारण शिजत असल्याची चर्चा सांगलीच्या राजकीय पटलावर सोमवारी रंगली होती.विटा, इस्लामपूर, सांगली, कुपवाड परिसरातील कार्यक्रमांना हजेरी लावताना त्यांनी कुठेही राजकीय टीकाटिपणी केली नाही. शरद पवार प्रणित राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या जिल्ह्यात त्यांचा दौरा होत असल्याने ते जयंतरावांवर टीका करतील, असा अंदाज वर्तविला जात होता. मात्र, जिल्ह्यातील कोणत्याही कार्यक्रमात त्यांनी विरोधी गटावर टीका न करता केवळ केंद्र व राज्य शासनाने केलेल्या कामांचा आढावा मांडणे पसंत केले. एरवी बेधडकपणे आरोप करण्याचे वैशिष्ट्य जपणाऱ्या अजित पवारांचे हे रूप जिल्ह्याने प्रथमच पाहिले.

राष्ट्रवादी एकसंध असतानाही जेव्हा कधी अजित पवार सांगलीत येत असत तेव्हा ते येथील राजकारणावर टीका करीत नेत्यांना चिमटे काढत असत. त्यांच्या प्रत्येक सांगली दाैऱ्यातील भाषणाचा ढाचा कायम राहिला होता. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते वेगळ्या भूमिकेतून सांगली जिल्ह्यात आले होते, मात्र त्यांचा वावरही वेगळा दिसून आला.अराजकीय दौऱ्याचा भास निर्माण केला तरी त्यांच्या दौऱ्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला होता. कुपवाड येथील कार्यक्रमास शासकीय कार्यक्रमाचा शिष्टाचार पाळत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. सत्ताधारी व विरोधी नेते एकाच व्यासपीठावर होते. त्यानंतर अजित पवारांनी काँग्रेसच्या नेत्या जयश्रीताई पाटील यांचीही भेट घेतली.

पक्ष विस्ताराचा कार्यक्रमअजित पवारांनी बंड केल्यानंतरही बराच काळ सांगली जिल्ह्यात त्यांच्या गळाला कोणी लागले नव्हते. सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गटात नेते, कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू झाला आहे. त्यामुळे पक्षाची उभारणी करीत जिल्हाभर विस्तार करण्याचा कार्यक्रम त्यांनी आखल्याचे त्यांच्या गटातील नेत्यांनी सांगितले.

अजित पवार सांगलीत, जयंतराव पाटणमध्ये

जयंत पाटील यांच्या इस्लामपूर मतदारसंघात सोमवारी अजित पवारांनी कार्यक्रमास हजेरी लावली असताना जयंत पाटील सातारा जिल्ह्यातील पाटण येथे होते. ‘राष्ट्रवादी विजय निश्चय’ अभियानाची सुरुवातही जयंत पाटील यांनी सोमवारीच केली.

टॅग्स :SangliसांगलीPoliticsराजकारणAjit Pawarअजित पवार