सांगलीत वकिलांची निदर्शन

By Admin | Updated: August 28, 2014 23:03 IST2014-08-28T22:58:52+5:302014-08-28T23:03:35+5:30

उद्या कामबंद आंदोलन

Demonstration of Sangli Wakila | सांगलीत वकिलांची निदर्शन

सांगलीत वकिलांची निदर्शन

सांगली : कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ करण्यात यावे, या मागणीसाठी आज वकिलांनी लाल फिती लावून काम केले. न्यायालयासमोर दुपारी वकिलांनी निदर्शनेही केली. आंदोलनाचे नेतृत्व बार असोसिएशनचे अध्यक्ष महेश जाधव यांनी केले.
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होण्याच्या मागणीकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेधार्थ आज वकिलांनी लाल फिती लावून काम केले. दुपारी जिल्हा न्यायालयासमोर निदर्शने करण्यात आली. अमोल पाटील, शैलेश हिंगमिरे, राजेंद्र माने, समीर डांगे, किरण रजपूत, आर. बी. साळुंखे सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)

कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ करण्यात यावे, या मागणीसाठी उद्या (शनिवार) वकिलांकडून कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर दिवसभर न्यायालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: Demonstration of Sangli Wakila