तुंबलेल्या नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST2021-06-27T04:18:48+5:302021-06-27T04:18:48+5:30

सांगली : गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी प्रवाहित असणारे नाले तुंबले आहेत. या गटारी स्वच्छ करुन नाले ...

Demand for uplift of blocked nallas | तुंबलेल्या नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

तुंबलेल्या नाल्यांचा उपसा करण्याची मागणी

सांगली : गेल्या आठवड्यात शहरात झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी प्रवाहित असणारे नाले तुंबले आहेत. या गटारी स्वच्छ करुन नाले प्रवाहित करण्याची मागणी होत आहे. शामरावनगर, शंभरफूटी रोड, टिंबर एरियातील अनेक नाले व गटारी अद्यापही पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत नाहीत त्या करण्याची मागणी होत आहे.

--------

वाहनांच्या गतीला आवर घाला

सांगली : शहरात रस्त्यावरील गर्दी वाढत असतानाच, वाहनधारक अत्यंत वेगाने वाहन चालवून अपघाताला निमंत्रण देत आहेत. अशा वाहनधारकांवर कडक कारवाईची मागणी होत आहे. रस्त्यावरील परिस्थितीचा विचार न करता अनेक वाहनधारक बेदरकारपणे वाहन चालवत आहेत. पोलिसांनी सध्या कारवाई सुरु केली असलीतरी अशा सुसाट वेगाने जाणाऱ्या वाहनधारकांवर कारवाईची मागणी होत आहे.

--------------------

मिरज-सलगरे मार्गावर गतिरोधकांची मागणी

सांगली : गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी असलेला मिरज-सलगरे मार्गाचे काम गतीने सुरु आहे. बहुतांश काम पूर्ण झाले असलेतरी या मार्गावर कुठेही गतिरोधक नाहीत तरी बांधकाम विभागाने रस्त्याचे काम पूर्ण करण्याबरोबरच ठिकठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी होत आहे. गतिरोधक नसल्याने या मार्गावर अपघातांची संख्या वाढत आहे.

-------------------

जुने झालेले विद्युत खांब बदलण्याची मागणी

सांगली : शहरातील अनेक मार्गावर जीर्ण झालेले विद्युत खांब असून ते बदलून नवीन खांब बसविण्याची मागणी होत आहे. काँग्रेस भवन, राममंदिर चौक परिसरातील काही खांब जुने झाले आहेत याशिवाय काही खांब रस्त्यालगत आले आहेत. या खांबांचेही स्थलांतर केल्यास वाहतुकीचा अडथळा दूर होणार असल्याने बदलण्याची मागणी होत आहे.

----

होम आयसोलेशनमध्ये सहा हजारांवर रुग्ण

सांगली : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या हजारावर स्थिर होत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही किंचीत वाढत आहे. सध्या सहा हजार ८८१ रुग्ण होमआयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत.

Web Title: Demand for uplift of blocked nallas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.