शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूर ते हैदराबादसह अन्य रेल्वे सुरू करण्याची मागणी, रेल्वे प्रवासी सल्लागार समितीची मुंबईत बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 16:11 IST

मिरज : मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या मुंबईतील बैठकीत साप्ताहिक कोल्हापूर हैदराबाद व वडोदरा एक्स्प्रेस, कोल्हापूर मुंबई ...

मिरज : मध्य रेल्वेच्या क्षेत्रीय रेल्वे प्रवासी सल्लागार समितीच्या मुंबईतील बैठकीत साप्ताहिक कोल्हापूर हैदराबाद व वडोदरा एक्स्प्रेस, कोल्हापूर मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात आली. नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्याचे आश्वासन रेल्वे अधिकाऱ्यांनी दिले.नागपूर, कोल्हापूर व धनबाद कोल्हापूर या दोन गाड्या कोल्हापूर येथे आल्यानंतर सुमारे ३५ तास देखभाल दुरुस्ती झाल्यानंतर रुकडी व हातकणंगले येथे आणून थांबवण्यात येतात. यावेळेचा उपयोग करून साप्ताहिक कोल्हापूर हैदराबाद व वडोदरा गाड्या सुरू करण्याची मागणी सदस्य सुकुमार पाटील यांनी केली.मध्य रेल्वेचे सरव्यवस्थापक नरेश लालवानी, अभय कुमार मिश्रा यांनी या गाड्या सुरू करण्यास तत्त्वतः मान्यता दिली. हा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे मंजुरीसाठी पाठवण्याचे आश्वासन दिले. बिकानेर ते पुणे येणारी गाडी पुढे पुणे ते मिरज अशी वेगळी क्रमांकाने धावते. त्यामुळे मिरज सांगली कोल्हापूर हातकणंगले येथून जाणाऱ्या प्रवाशांना दोन वेगवेगळी तिकिटे घ्यावे लागत असल्याने नाहक भुर्दंड होतो. ही एकच गाडी असताना दोन वेगवेगग्या क्रमांकाने धावण्याऐवजी बिकानेर ते मिरज अशी एकाच क्रमांकाची गाडी चालवण्याची सूचना केली. पुणे दिल्ली दर्शन एक्स्प्रेस मिरजपर्यंत वाढवली आहे, त्या धर्तीवर बिकानेर ते मिरज एक्स्प्रेस करावी ही मागणी बैठकीत मान्य केली. कोल्हापूर ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस लवकर सुरू करण्याची मागणी केली. याबाबत वरिष्ठ स्तरावर तयारी सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ही गाडी लवकरच सुरू होईल, असे आश्वासन दिले. बैठकीस खासदार धनंजय महाडिक, सोलापूरचे खासदार सिद्धारूढ स्वामी यांच्यासह कर्नाटक, महाराष्ट्र व मध्य प्रदेशातील सल्लागार उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरrailwayरेल्वे