सांगली : शासकीय नोकरीत अधिकारी असलेल्या महिलेची बदनामी करण्याची भीती घालून त्यांच्या पतीकडे दहा लाखांची मागणी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी विक्रम दिनकर पाटील (रा. यश लक्ष्मी बंगला, मॉडर्न इंग्लिश स्कूल समोर, अजिंक्यनगर, सांगली) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अभिजित बसुगडे (रा. जयसिंगपूर) याच्यावर बीएनएस कलम ३०८ (३) अन्वये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी विक्रम पाटील हे साखर व्यापारी आहेत. त्यांची पत्नी राज्य उत्पादन शुल्क विभागात कार्यरत आहे. दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५:३० च्या सुमारास शहरातील हॉटेल ग्रेट मराठामध्ये फिर्यादी पाटील बसले होते. तेव्हा तेथे संशयित अभिजित बसुगडे हा आला. त्याने आपण एका प्रतिष्ठित दैनिकाचा प्रतिनिधी असून, माझ्याकडे तुमच्याविरोधात तक्रार आली आहे. इचलकरंजी येथील रणजित विलास जाधव यांना तुमच्या पत्नीच्या विरोधात उत्पादन शुल्क विभाग कार्यालयासमोर उपोषणास बसविणार आहोत. यातून तुमची आणि तुमच्या पत्नीची बदनामी करणार असून, हे प्रकरण मिटविण्यासाठी दहा लाख रुपये द्या, अशी मागणी संशयित बसुगडे याने केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार पोलिसांनी बसगुडे याच्याविरोधात विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान, या संदर्भात व्यावसायिक विक्रम पाटील यांनी दि. २३ फेब्रुवारी रोजी पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांच्याकडे संशयित बसुगडे याच्याविरोधात तक्रार दिली होती. त्यामध्ये बसुगडे याच्याकडून माझ्या जीवितास धोका असून, त्याची खंडणी विरोधी पथकातील सक्षम अधिकाऱ्याकडून चौकशी करण्याची मागणी केली होती.
Web Summary : In Sangli, a man demanded ₹10 lakhs from a sugar trader, threatening to defame his government official wife by staging a protest. Police have registered a case of extortion against the accused, Abhijit Basugade.
Web Summary : सांगली में, एक व्यक्ति ने एक चीनी व्यापारी से ₹10 लाख की मांग की और उसकी सरकारी अधिकारी पत्नी को विरोध प्रदर्शन करके बदनाम करने की धमकी दी। पुलिस ने आरोपी अभिजीत बसुगडे के खिलाफ उगाही का मामला दर्ज किया है।