अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:10 IST2021-01-13T05:10:48+5:302021-01-13T05:10:48+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले ...

Demand for implementation of monthly pension scheme for Anganwadi workers | अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दरमहा पेन्शन योजना लागू करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवासमाप्तीनंतर पेन्शन योजना लागू करण्याबाबतचे निवेदन येथील बालविकास प्रकल्प अधिकारी सतीश नवले यांना देण्यात आले. यावेळी राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियनच्या (आयटक) महासचिव शौकत पठाण आणि जिल्हाध्यक्षा मंगल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

निवेदनात म्हटले आहे की, आताच्या मानधनाच्या ५० टक्के रक्कम सेवानवृत्तीनंतर दरमहा पेन्शन म्हणून देण्यात यावी, याप्रमाणे अंगणवाडी सेविकांना ४,२५० रु., मिनी अंगणवाडी सेविकांना २,८७५ रु. व मदतनिसांना २,२५० रु. दरमहा पेन्शन मिळू शकेल.

सध्या महाराष्ट्र राज्यातील अंगणवाडी सेविकांना सेवासमाप्तीनंतर १ लाख रुपये व मदतनिसांना ३० वर्षाच्या सेवेनंतर ७५ हजार रुपये सेवासमाप्ती लाभ मिळतो. या रकमेमध्ये अंगणवाडी

कर्मचाऱ्यांचा वृध्दापकाळामध्ये निर्वाह होऊ शकत नाही. या आर्थिक लाभाबरोबर त्यांना पेन्शन योजना लागू करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनावर जिल्हाध्यक्षा मंगल पाटील, उपाध्यक्ष जयश्री चंदनशिवे, सरचिटणीस संगीता तवटे, शिराळा तालुकाध्यक्षा कमल गुरव, उपाध्यक्षा नंदा भोसले आणि राज्य महासचिव शौकत पठाण यांच्या सह्या आहेत.

Web Title: Demand for implementation of monthly pension scheme for Anganwadi workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.