इस्लामपुरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:17 IST2021-07-09T04:17:54+5:302021-07-09T04:17:54+5:30
इस्लामपूर येथे महाडिक युवा शक्तीच्यावतीने साहेबराव जाधव, सतीश दंडवते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुजित थोरात, सतीश पवार, धीरज ...

इस्लामपुरात मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
इस्लामपूर येथे महाडिक युवा शक्तीच्यावतीने साहेबराव जाधव, सतीश दंडवते यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सुजित थोरात, सतीश पवार, धीरज कबुरे, मयुरेश शेजाळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरामध्ये भटक्या जनावरांची संख्या लक्षणीय झाली आहे. त्यामुळे लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना अनेकवेळा धोका पोहोचला आहे. या मोकाट आणि भटक्या जनावरांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, अशी मागणी महाडिक युवा शक्तीचे अध्यक्ष सुजित थोरात यांनी केली आहे.
थोरात यांच्यासह मनसेचे सतीश पवार यांचे शिष्टमंडळाने नगरपालिकेतील आरोग्य विभागाचे अधिकारी साहेबराव जाधव, सतीश दंडवते यांना निवेदन दिले. मोकाट कुत्र्यांमुळे लहान मुलांच्या जिवास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे तसेच डुकरांमुळे नागरी वस्तीमध्ये दुर्गंधी वाढत आहे. त्यातच सगळ्या शहरात मोकाट फिरणाऱ्या गाढवांचीही संख्या मोठी आहे. त्यामुळे या मोकाट जनावरांचा पालिका प्रशासनाने बंदोबस्त करावा, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी धीरज कबुरे, मयुरेश शेजाळे, हृषिकेश पाटणकर, संकेत भंडारी उपस्थित होते.