मिनाई शाळेचा परवाना रद्द करा दलित महसंघाची मागणी : ऐतवडे खुर्द येथे निषेध फेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:19 IST2018-10-01T10:17:20+5:302018-10-01T10:19:41+5:30
कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रम शाळेतील लैंगिक शोषणप्रकरणी ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे निषेध फेरी काढण्यात आली. अरविंद पवारला फाशी द्या, शाळेचा परवाना रद्द करा, पीडित मुलींना मदत द्यावी,

मिनाई शाळेचा परवाना रद्द करा दलित महसंघाची मागणी : ऐतवडे खुर्द येथे निषेध फेरी
कुरळप : कुरळप (ता. वाळवा) येथील मिनाई आश्रम शाळेतील लैंगिक शोषणप्रकरणी ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे निषेध फेरी काढण्यात आली. अरविंद पवारला फाशी द्या, शाळेचा परवाना रद्द करा, पीडित मुलींना मदत द्यावी, आदी घोषणा देत दलित महासंघाच्यावतीने निषेध फेरी काढण्यात आली.
बाजारपेठतून निषेध फेरीला सुरुवात झाली. शिवछत्रपती चौकात सांगता झाली. यावेळी संतोष चादणे, अनिल पाटील, यौहान मोरे, उत्तम चांदणे यांनी मनोगत व्यक्त केले. सहायक पोलीस निरीक्षक विवेक पाटील म्हणाले, गावांमध्ये आजूबाजूला घडणाºया घटनांकडे लक्ष देण्याची गरज आहे. आश्रमशाळेतील मुलींच्या धाडसामुळेच हे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघडकीस आले.
यावेळी विविध मागण्यांचे निवेदन कुरळप पोलिसांना देण्यात आले. यावेळी दत्तात्रय पाटील, संदीप चौगुले, सह. पोलीस पाटील मोहन चांदणे, सुधीर बनसोडे, शशिकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य मनीषा पाटील, शीतल चांदणे, विमल पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.