माडग्याळ पेयजल योजनेच्या चाैकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:18 IST2021-07-10T04:18:28+5:302021-07-10T04:18:28+5:30
निवेदनात म्हटले आहे की, माडग्याळ जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने आठ शाळांमध्ये जलजीवन योजनेतून ...

माडग्याळ पेयजल योजनेच्या चाैकशीची मागणी
निवेदनात म्हटले आहे की, माडग्याळ जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने आठ शाळांमध्ये जलजीवन योजनेतून टेंडर काढले. मात्र या योजनेतील कामे नियमबाह्य असल्याच्या तक्रारी आहेत. आठ शाळांपैकी पाच शाळांत नवीन बोअरवेल मारल्याचे एमबीमध्ये दाखवीत पैसे लाटल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे पाचपैकी दोन ठिकाणीच बोअरवेल मारले आहे. अन्यत्र तीन ठिकाणी बोअरवेल न मारता खासगी शेतकऱ्यांच्या असलेल्या बोअरवेलमध्ये मोटारी सोडून काम पूर्ण करण्याचा घाट घातला गेला आहे. तीन ठिकाणी बोअरवेल खुदाई न करताच ग्रामविकास अधिकारी, सरपंच यांना हाताशी धरून १४व्या वित्त आयोगाच्या निधीमधून पैसे काढलेले आहेत. विशेष म्हणजे जिल्हा परिषद कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांकडून या कामाची तपासणी करूनच बिल पास होणे गरजेचे असताना कामाचे निरीक्षण न करताच नवीन बोअरवेल खुदाईची बिले ठेकेदाराला देण्यात आली आहेत. या योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून यामध्ये आजी-माजी पदाधिकारी तसेच अधिकारी असल्याचा संशय असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी विक्रम ढोणे यांनी केली आहे.
090721\img_20210709_091333.jpg
माडग्याळ पेयजल योजनेत भ्रष्टाचार, ग्रामस्थांची चौकशीची मागणी