भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2018 01:04 AM2018-01-07T01:04:02+5:302018-01-07T01:04:02+5:30

 Demand of Bhide, Ekboat's arrest: Sambhaji Brigade demands: Curfew-Bhima protests | भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध

भिडे, एकबोटेंच्या अटकेचे धाडस दाखवा संभाजी ब्रिगेडची मागणी : कोरेगाव-भीमा येथील घटनेचा निषेध

Next

सांगली : कोरेगाव-भीमा येथील दंगलप्रकरणी संभाजीराव भिडे व मिलिंद एकबोटे यांना अटक करण्याचे धाडस प्रशासनाने दाखवावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कोरेगाव-भीमा व वढू-बुद्रुकमध्ये झालेल्या जातीय हिंसाचाराचा संभाजी ब्रिगेड निषेध करीत आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांच्याबद्दल व त्यांच्या कार्याबद्दल ब्रिगेडला आदर आहे. मनोहर (संभाजीराव) भिडे व मिलिंद एकबोटे यांनी संपूर्ण महाराष्टÑात इतिहासाची मोडतोड करुन मराठा समाजाच्या तरुणांची माथी भडकावण्याचा उद्योग केल्याने दंगलसद्दश परिस्थिती निर्माण झाली, हे कोणीही नाकारु शकत नाही.

शिवशाहीच्या हुंकारातून पेशवाईचा जीर्णोद्धार करण्याचा महाराष्टÑात व देशामध्ये जो प्रयोग सुरू आहे, त्याचा ब्रिगेड निषेध करीत आहे. शिवरायांना अपेक्षित असणारे अठरापगड जातीचे समतावादी शिवस्वराज्य उभारणीसाठी तसेच मराठा-दलित आणि हिंदू-मुस्लिम सलोख्यासाठी ब्रिगेडचा प्रयत्न राहील. मराठा सेवा संघाच्या प्रबोधनामुळे मराठा व बहुजनांची मुले आता खरा इतिहास वाचू लागली आहेत.

पत्रकारवर जिल्हाध्यक्ष सुयोग औंधकर, कार्याध्यक्ष प्रणव भोसले, कोषाध्यक्ष गणेश देसाई, सचिव बाळासाहेब लिपाणे-पाटील, कायदा सल्लागार डॉ. महेश पाटील यांच्या सह्या आहेत.

जनतेचा विश्वास उडाला..
अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेले संशयित प्रसारमाध्यमांना बेधडक मुलाखती देत आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिसप्रमुख त्यांच्यासमोर हात जोडत आहेत. तरीही गृहमंत्रीपद सांभाळणारे मुख्यमंत्री संशयितांना अटक करण्याचे धाडस दाखवित नाहीत. त्यामुळे घटनेप्रमाणे राज्य चाललंय यावर जनतेचा विश्वास उडाला आहे, असेही निवेदनात म्हटले आहे.

Web Title:  Demand of Bhide, Ekboat's arrest: Sambhaji Brigade demands: Curfew-Bhima protests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.