सांगलीतील रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:26 IST2021-04-24T04:26:05+5:302021-04-24T04:26:05+5:30

मोकळ्या जागांचा विकास करा सांगली : महापालिकेने शहरातील मोकळ्या जागांचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. दोन वर्षांपूर्वी काही ...

Delete construction materials on roads in Sangli | सांगलीतील रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटवा

सांगलीतील रस्त्यावरील बांधकाम साहित्य हटवा

मोकळ्या जागांचा विकास करा

सांगली : महापालिकेने शहरातील मोकळ्या जागांचा विकास करावा, अशी मागणी नागरिकांची आहे. दोन वर्षांपूर्वी काही ठिकाणी खेळण्याचे तसेच व्यायामाचे साहित्य लावून विकास केला होता. त्यानंतर पुन्हा अन्य मोकळ्या जागांचा विकासच झाला नाही. याकडे महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज आहे.

मनरेगामधील मजुरांच्या हाताला हवे काम

सांगली : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत विविध कामांच्या माध्यमातून नोंदणीकृत मजुरांना काम उपलब्ध करून दिले जाते. यातून रोजगार प्राप्त होत असतो. परंतु, सध्या काही ठिकाणी ही कामे बंद आहेत. त्यामुळे मजुरांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

थकीत अनुदान त्वरित द्यावे

सांगली : आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन मिळावे, यासाठी जिल्हा परिषद समाजकल्याण विभागातर्फे आंतरजातीय विवाहासाठी प्रोत्साहन योजना शासनाकडून राबविली जाते. यासाठी अनेकांनी अर्ज केले आहेत. मात्र, समाजकल्याण विभागाकडे निधी नसल्याने लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत.

Web Title: Delete construction materials on roads in Sangli