शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: कर्जबाजारी द्राक्षबागायतदाराची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2022 15:42 IST

दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते.

मिरज : सोनी (ता. मिरज) येथील दीपक सुबराव सूर्यवंशी (वय ४२) या द्राक्षबागायतदाराने विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केली. द्राक्षबागेत नुकसान झाल्याने व कर्जाच्या विवंचनेतून त्यांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (दि. २) दुपारी मणेराजुरी (ता. तासगाव) हद्दीतील शेतात त्यांचा मृतदेह आढळला. या घटनेमुळे सोनी परिसरात खळबळ उडाली आहे.सोनी येथे कुमठे रस्त्यावर शेतात सूर्यवंशी पत्नी, मुलगा व मुलीसह राहत होते. त्यांची अडीच एकर द्राक्षबाग आहे. दोन वर्षांपासून सततच्या अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे मोठे नुकसान झाले होते. उरल्यासुरल्या बागेतील द्राक्षाला दरही चांगला मिळाला नव्हता. त्यामुळे सूर्यवंशी आर्थिक विवंचनेत होते. बागेत उत्पन्न नसल्याने कर्जाची परतफेड कशी करायची याची चिंता लागून राहिली होती. उसातूनही उत्पन्न मिळाले नव्हते.

याच चिंतेतून त्यांनी सहा महिन्यांपूर्वी घरातच विष प्राशन केले होते. त्यावेळी कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने जीव वाचला होता. असे कृत्य पुन्हा न करण्याविषयी कुटुंबीयांनी, मित्र व नातेवाइकांनी दीपक यांची समजवले होते.सोमवारी (दि. १) ते जायगव्हाणला (ता. तासगाव) जाऊन येतो म्हणून घराबाहेर पडले. त्यानंतर घरी परतले नाहीत. कुटुंबीय त्यांच्या प्रतीक्षेत होते. मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास मणेराजुरी येथे कोड्याच्या मळ्याजवळ दीपक यांचा मृतदेह आढळला. ग्रामस्थांनी पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असता दीपक यांनी विषारी द्रव्य पिऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले.

अडीच लाखांचे कर्जदीपक यांनी द्राक्षबागेसाठी बँकांचे सुमारे अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. पण गेल्या दोन वर्षात बागेचे मोठे नुकसान झाल्याने कर्ज फेडू शकले नव्हते. यातूनच निराश होऊन सूर्यवंशी यांनी आत्महत्या केल्याचा संशय आहे. त्यांचा मृतदेह घराकडे आणल्यानंतर कुटुंबीयांनी आक्रोश केला.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी