दिघंचीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST2021-07-27T04:28:08+5:302021-07-27T04:28:08+5:30

दिघंची : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिघंची (ता. आटपाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या ...

Dedication of a long-awaited ambulance | दिघंचीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

दिघंचीत रुग्णवाहिकेचे लोकार्पण

दिघंची : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दिघंची (ता. आटपाडी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास आमदार गोपीचंद पडळकर यांच्या स्थानिक विकास निधीतून रुग्णवाहिका देण्यात आली. या रुग्णवाहिकेचे लोकार्पण सोमवारी आमदार गोपीचंद पडळकर, माजी समाजकल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर, माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, जिल्हा परिषद सदस्य मोहन रणदिवे, सरपंच अमोल मोरे, ब्रह्मदेव होनमाने, भाजप नेते जयवंत सरगर, वैद्यकीय अधिकारी साधना पवार, आरोग्य अधिकारी विनायक पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

दिघंची आरोग्य केंद्रात सर्व सुविधा उपलब्ध असून रुग्णवाहिकेची कमतरता होती. आता रुग्णवाहिका मिळाल्याने दिघंची आरोग्य केंद्रांतर्गत गावातील रुग्णांची सोय होणार आहे. या वेळी अण्णासाहेब जाधव, शेखर रणदिवे, बाळासाहेब होनराव, मुन्ना तांबोळी, विकास मोरे, प्रणव गुरव, श्रीरंग शिंदे, अविनाश रणदिवे, चंद्रकांत पुसावळे आदी उपस्थित होते.

चौकट

जिल्ह्यात दिघंची आरोग्य केंद्राचे काम उत्कृष्ट आहे. ऑक्सिजनचे किट असणारी रुग्णवाहिका येथे दिली असून रुग्णांची सोय होणार आहे. लवकरच आटपाडी तालुक्यातील डायलेसिसची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी युनिट उपलब्ध करून देऊ तसेच रुग्णांच्या सोयीसाठी कार्डियाक रुग्णवाहिका देणार आहे.

- गोपीचंद पडळकर, आमदार

फोटो : २६ दिघंची १

ओळी : दिघंची (ता. आटपाडी) येथे रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. या वेळी आमदार गोपीचंद पडळकर, ब्रह्मानंद पडळकर, हर्षवर्धन देशमुख उपस्थित हाेते.

260721\img-20210726-wa0011.jpg

रुग्णवाहिका बातमी फोटो

Web Title: Dedication of a long-awaited ambulance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.