शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चांदोली धरणातील पाणीसाठ्यात घट, वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 12:52 IST

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक पूर्णपणे ...

शिराळा : चांदोली (ता. शिराळा) येथील धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने पूर्ण उघडीप दिली होती. त्यामुळे धरणात पाण्याची आवक पूर्णपणे बंद झाल्याने दि. ३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले होते. या धरणातून वीजनिर्मिती केंद्र तसेच कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या २९ दिवसांत एक टीएमसी पाणीसाठा कमी झाला होता. तर ३३ दिवसांत २.५९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षीपेक्षा हा साठा १.१८ टीएमसीने कमी आहे. सध्या फक्त वीजनिर्मिती केंद्रातून १४०० क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. कॅनॉलमध्ये २५० तर नदीत ११५० क्यूसेकने विसर्ग सुरू आहे.या धरण पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी दिली होती. यामुळे १ ऑक्टोबरला चारही वक्राकार दरवाजे उघडले होते. पावसाने उघडीप दिल्याने दि.३ ऑक्टोबरला हे दरवाजे बंद करण्यात आले होते. यानंतर फक्त वीजनिर्मिती केंद्रातून विसर्ग सुरू होता. मात्र त्यानंतर पाण्याची आवक पूर्ण थांबल्याने वीजनिर्मिती केंद्र बंद करण्यात आले होते. ३१ ऑक्टोबरपर्यंत एक टीएमसी पाणीसाठा कमी झाला होता. आता दि. ३ डिसेंबरपर्यंत एकूण ३.५९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. यावर्षी धरण परिसरात आजअखेर १८८९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.या धरणाची ३३.४० टीएमसी क्षमता असून ३०.८१ टीएमसी (८९.५५ टक्के) तसेच उपयुक्त साठा २३.९३ टीएमसी (८६.९४ टक्के) पाणीसाठा आहे. गेल्या दोन महिन्यांत ३.५९ टीएमसी पाणीसाठा कमी झाला आहे. गतवर्षी हा साठा २५.११ टीएमसी होता. म्हणजे यावर्षी १.१८ टीएमसी साठा कमी आहे.

आजची स्थिती

  • एकूण पाणीसाठा क्षमता : ३४.४० टीएमसी
  • धरण पातळी : ६२३.६५ मिटर
  • धरण पाणी साठा : ३०.८१ टीएमसी ( ८९.५५ टक्के)
  • उपयुक्त पाणीसाठा : २३.९३ टीएमसी (८६.९४ टक्के)
  • एकूण पाऊस : १८८९ मिलिमीटर
  • आवक : ००.०० क्यूसेक
  • वीजनिर्मिती केंद्रातून : १४०० क्यूसेक
  • यातील कालव्यातून : २५० क्यूसेक
  • नदीपात्रात : ११५० क्यूसेक.
टॅग्स :SangliसांगलीDamधरणWaterपाणी