शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हमीभावाचा निर्णय शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांनाही जाचक _ सांगलीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 21:25 IST

शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, उच्च प्रतीच्या मालास हमीभावाने दर दिला, तर कमी दर्जाच्या शेतमालास कोणता दर द्यावयाचा, याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिले नसल्याने शेतकऱ्यांसह

सांगली : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र, उच्च प्रतीच्या मालास हमीभावाने दर दिला, तर कमी दर्जाच्या शेतमालास कोणता दर द्यावयाचा, याबाबत कोणतेही निर्देश सरकारने दिले नसल्याने शेतकऱ्यांसह व्यापाºयांनाही अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.

सांगलीत सध्या ज्वारीला २००० ते २१०० रूपये, तर बाजरीला १६०० ते १८५० रूपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे. तो हमीभावापेक्षा कमी आहे. धान्य व्यापाºयांनी सांगितले की, धान्याचा रंग, दर्जा व त्याची मागणी आणि पुरवठा यावर दर अवलंंबूून असतो. चांगल्या धान्यास हमीभावाप्रमाणे दर देता येतो. मात्र, यापेक्षा कितीतरी कमी दर्जाचे धान्य बाजारात येते. त्याला दर कोणता द्यायचा, याबाबत संभ्रम आहे. शेतकऱ्यांची अडचण ओळखून दर्जाप्रमाणे दर देऊन माल खरेदी केला तर कारवाईची भीती आणि खरेदी केला नाही, तर शेतकऱ्यांचे नुक सान, अशी स्थिती आहे.

शेतकऱ्यांना हमीभाव मिळायलाच हवा, यासाठी आग्रही आहोत. मात्र, याची घोषणा करताना मालाच्या दर्जाचा विचार झालेला दिसत नाही. त्यामुळे कमी दर्जाचा माल व्यापारी हमीभावाने खरेदी करणार नाहीत. परिणामी यात शेतकºयांचे नुकसान होणार आहे. आधारभूत किमतीतच सर्व दर्जाचा माल घ्या म्हणणेही चुकीचे आहे. त्यामुळे शासनाने प्रतवारीनुसार आधारभूत किंमत जाहीर करावी आणि शासनाने ही किंमत न ठरविता, प्रत्यक्ष तो माल पाहणाºया यंत्रणेला दर ठरविण्याबाबत निर्देश देण्यात यावेत. तरच शेतकºयांना चांगला दर मिळणार आहे.- दिनकर पाटील, सभापती, बाजार समिती, सांगलीशेतकºयांच्या शेतीमालाला हमीभाव द्यायलाच हवा. शेतीमालाची आवक, त्याचे वितरण आणि प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंतची त्याची विक्री याचा अभ्यास व्हायला हवा. धान्याचा दर त्याच्या दर्जानुसार ठरविला गेला पाहिजे. मात्र, हमीभावाच्या सक्तीने माल खरेदी न झाल्याने शेतकºयांचेही आर्थिक नुकसान होणार आहे. कमी दर्जाचा शेतीमाल हमीभावाने खरेदी करून त्याची विक्री करताना, तसा दर मिळाला नाही तर व्यापाऱ्यांचे नुकसान होते. त्यामुळे शासनाने मालानुसार दर ठरविल्यास शेतकरी व व्यापारी या दोन्ही घटकांना दिलासा मिळणार आहे.- राहुल सावर्डेकर, अध्यक्ष, धान्य व्यापारी संघटना, सांगली

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरीMONEYपैसा