शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
2
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
3
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
4
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
5
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
6
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
7
प्रियकराने केली शिवीगाळ, वडिलांचा अपमान सहन न झालेल्या २० वर्षीय मुलीने उचललं टोकाचं पाऊल
8
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
9
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
10
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
11
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
12
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
13
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
14
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
15
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
16
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
17
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
18
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
19
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
20
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू

मद्यनिर्मितीच्या स्पिरिटला जीएसटीमधून सवलतीचा निर्णय; राज्यभरातील साखर कारखाने, आसवनी प्रकल्पांना दिलासा

By संतोष भिसे | Updated: June 28, 2024 17:08 IST

सांगली : साखर कारखान्यांमध्ये मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा रेक्टिफाइड स्पिरिटवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय अर्थ ...

सांगली : साखर कारखान्यांमध्ये मद्य निर्मितीसाठी वापरले जाणारे एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा रेक्टिफाइड स्पिरिटवरील जीएसटी रद्द करण्याचा निर्णय अर्थ मंत्रालयाने घेतला आहे. त्यामुळे साखर आणि आसवनी उद्योगाला फार मोठा दिलासा मिळाला आहे.गेल्या शनिवारी जीएसटी परिषदेची ५३ वी बैठक झाली. त्यात विविध उत्पादनांवरील जीएसटी आकारणीचा आढावा  घेण्यात आला. त्यात साखर  कारखान्यांना दिलासा देणारा हा निर्णय घेण्यात आला आहे. एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोल तथा स्पिरिटवर यापूर्वी वस्तू आणि सेवा कर आकारणी केली जायची. जीएसटी परिषदेच्या बैठकीतील निर्णयानुसार मानवी वापरासाठीच्या अल्कोहोलयुक्त मद्य उत्पादनासाठी त्यात सवलतीचा निर्णय झाला. या मद्यासाठी वापरल्या जाणाऱ्या स्पिरीटला जीएसटीच्या कक्षेतून वगळण्याला मंजुरी मिळाली. त्यामुळे आसवनी उद्योगावरील कराचा भार हलका झाला आहे.दरम्यान, महाराष्ट्रभरातील साखर कारखाने व आसवनी प्रकल्पांना जीएसटी विभागाने करवसुलीसाठी यापूर्वी शेकडो कोटींच्या कारणे दाखवा नोटिसा बजावल्या होत्या. मद्यनिर्मितीसाठीचे स्पिरिट व एक्स्ट्रा न्यूट्रल अल्कोहोलवर जीएसटी भरण्याचे आदेश दिले होते. या रकमा काही कोटींच्या घरात आहेत. जीएसटी परिषदेने आता हा कर माफ केल्याने कारखान्यांना बजावलेल्या नोटिसा मागे घ्याव्या लागण्याची शक्यता आहे. करमाफीचा निर्णय पूर्वलक्षी प्रभावाने अंमलात आल्यास कारखान्यांचा फायदा होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीSugar factoryसाखर कारखानेGSTजीएसटी