काँग्रेसअंतर्गत वाद उफाळला

By Admin | Updated: April 10, 2015 01:04 IST2015-04-09T23:29:37+5:302015-04-10T01:04:30+5:30

स्थायी समितीत पडसाद : निमित्त इतिवृत्ताचे, कारण निविदेचे, शह-काटशह

Debate arose under Congress | काँग्रेसअंतर्गत वाद उफाळला

काँग्रेसअंतर्गत वाद उफाळला

सांगली : महापालिकेत सत्ताधारी काँग्रेसअंतर्गत वाद उफाळून आला असून शह-काटशहच्या राजकारणाला सुरूवात झाली आहे. त्याचा प्रत्यय गुरुवारी स्थायी समिती सभेत आला. नगरसेवक हारुण शिकलगार यांनी, इतिवृत्त अपूर्ण असल्याने सभा तहकूब करण्याची मागणी केली. त्यात एक कोटी ७२ लाख रुपयांची कामे निविदा पद्धतीने करण्यास मंजुरी दिली असताना, ती विनानिविदा करण्याचा ठराव करण्यात आल्याचे शिकलगार यांनी निदर्शनास आणून दिले. त्यातून सभापती संजय मेंढे व शिकलगार यांच्यात शाब्दिक चकमक झाली. या वादामुळे रागारागाने सभापतींनी सभा तहकूब करून सभागृह सोडले.
सभापती मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी एक वाजता स्थायी समितीची सभा होती. सभा सुरू होताच हारुण शिकलगार यांनी गत सभेचे इतिवृत्त वाचण्याची मागणी केली. अजून इतिवृत्त अपूर्ण असल्याचे सभापतींनी सांगितले. त्यावर शिकलगार आक्रमक झाले. इतिवृत्त पूर्ण झाल्याशिवाय सभा घेऊ नये, असा पवित्रा त्यांनी घेतला.
त्यातच सभेची वेळ सकाळी अकराची असताना दुपारी एकची का करण्यात आली? असा सवालही शिकलगार यांनी केला. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात बैठक असल्याने वेळ बदलल्याचे उपायुक्तांनी स्पष्ट केले. त्यावर शिकलगार यांनी, उपायुक्तांना अधिकार आहेत का? अशा शब्दात हल्ला चढविला.
गत महिन्याभरातील स्थायी समिती सभेत एक कोटी ७२ लाख रुपयांची कामे निविदा पद्धतीने करण्यास मंजुरी दिली होती. स्थायीने ठराव मात्र विनानिविदेचा केला आहे. या सभेचे इतिवृत्तही पुढील सभेत मंजूर झाले आहे. असे असताना आज शिकलगार यांनी मंजूर इतिवृत्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या ठरावालाही शिकलगार यांनी विरोध केला.
सभापती मेंढे यांनी, इतिवृत्त पूर्ण करूया, सभा होऊद्या, अशी भूमिका घेतली. पण शिकलगार यांनी आपली भूमिका मागे घेतली नाही. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या सभापतींनी सभा तहकूब केली. (प्रतिनिधी)


५महापौरांचा टोला
स्थायी सभेत काय घडले, याची माहिती आपण घेत आहोत. इतिवृत्त अपूर्ण असल्याने सभा तहकूब झाल्याचे कळले. राष्ट्रवादीने उगाच आमच्यावर टीका करू नये. कोणी कॉपी करून मेरीटमध्ये येत नाही, असा टोला महापौर विवेक कांबळे यांनी लगाविला.

Web Title: Debate arose under Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.