शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: मारहाणीतील जखमी युवकाचा मृत्यू, खुनाचा गुन्हा दाखल; संशयित आरोपीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 15:42 IST

संशयित आरोपीची न्यायालयातून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती

विकास शहाशिराळा: चिखली (ता.शिराळा) येथे जुन्या पैशाच्या देणे घेणेच्या कारणावरुन झालेल्या मारहाणीत जखमी अमृत दत्तात्रय देसाई (रा. भाटशिरगाव) यांचा उपचारादरम्यान कराड येथील रुग्णालयात बुधवारी (दि.२९) मृत्यू झाला आहे. सदर घटना ६ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास घडली होती. याबाबत संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड (रा.चिखली) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली आहे.याबाबत माहिती अशी की, फिर्यादी सुनिल बाबासाहेब देसाई व त्याचा चुलत भाऊ अमृत दत्तात्रय देसाई हे संशयित आरोपी सुहास नामदेव गायकवाड यांचे घरी जेवायला गेले होते. यावेळी जुन्या पैशाच्या देणे घेणेच्या कारणावरुन वाद झाला. संशयित आरोपी सुहास गायकवाड याने तेथील ठेवलेल्या खो-याने सुनील देसाई यांच्या डोक्यात व अमृत देसाई यास डावे कानावर मारुन मारहाण करुन गंभीर जखमी केले होते.याबाबत ६ एप्रिल रोजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता. दि.७ रोजी सुहास गायकवाड यास अटक केली होती. त्यास न्यायालयात हजर केले असता दि. ०८ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयातून जामिनावर मुक्तता करण्यात आली होती.जखमी अमृत देसाई यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने कराड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचार सुरू असताना बुधवारी दि.२९ मे रोजी दुपारी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्यावर भाटशिरगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत अमृत देसाई यांच्या पश्यात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे.याबाबत संशयित आरोपी सुहास गायकवाड याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपास हवालदार बी.एस. भोसले यांनी केला होता. पुढील तपास पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम हे करीत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस