शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: आईसह तीन मुलींचे मृतदेह तलावात आढळले, जत तालुक्यात उडाली एकच खळबळ

By श्रीनिवास नागे | Updated: October 10, 2022 11:48 IST

ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा

सांगली : जत तालुक्यातील बिळूर येथील लिंगनूर तलावात काल, रविवारी मध्यरात्री आईसह तीन मुलींचे मृतदेह आढळून आले. सुनिता तुकाराम माळी (वय ३०), ऐश्वर्या तुकाराम माळी (८), अश्विनी तुकाराम माळी (९) व अमृता तुकाराम माळी (१२) अशी मृतांची नावे आहेत. ग्रामस्थांनी घातपाताचा संशय व्यक्त केला असून पतीनेच पत्नीसह तीन मुलींना तलावात ढकलून दिल्याची चर्चा आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पती तुकाराम माळी यास ग्रामस्थांनी जत पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे. त्याने दारूच्या नशेत हे कृत्य केले असल्याची चर्चा आहे.जत-बिळूर रस्त्यावर बिळूरपासून दोन किलोमीटरवर पूर्वेस सुतार वस्तीजवळ लिंगनूत पाझर तलाव आहे. या तलावालगतच माळी यांची वस्ती आहे. एवढी एकच वस्ती असल्यामुळे आसपास कोणीही नाही. तेथे तुकाराम माळी पत्नी व तीन मुलींसह राहत होता. तो दारूच्या आहारी गेल्यामुळे घरात पत्नीशी वारंवार खटके उडत. रविवारी दिवसभर संशयित तुकाराम माळी दारूच्या नशेत होता. नशेत वस्तीवरील काही जणांशी त्याचे भांडणही झाले होते. रात्री दारूच्या नशेत त्याने पत्नी व तीन मुलींना मारहाण करून तलावात ढकलून दिले असल्याची चर्चा आहे.रात्री घरात कोणीच नसल्याचे पाहून शेजारच्या ग्रामस्थांनी या कुटुंबाची शोधाशोध सुरू केली. रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास सुनिता व त्यांच्या तीन मुलींचे मृतदेह तलावात तरंगत असलेले आढळून आले. संशयित तुकाराम माळी मात्र कोठेच आढळून आला नाही. ग्रामस्थांनी पोलिसांना कळवल्यानंतर पथकाने घटनास्थळी धाव घेतली.सोमवारी सकाळी जत येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांचे मृतदेह उत्तरीय तपासण्यासाठी आणण्यात आले. सकाळी दहा वाजता मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. या घटनेमुळे बिळूर परिसरात परिसरात खळबळ उडाली आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस