सांगतील ऊसतोड मजुराची मुलगी बनली न्यायाधीश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 05:57 AM2017-10-26T05:57:15+5:302017-10-26T05:57:43+5:30

जत (जि. सांगली) : अन्नपूर्णा ईश्वर आवटी. उमराणी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजुराची मुलगी. कठिण परिस्थितीतून शिक्षण घेताना वकील होण्याचे स्वप्न बाळगले. कठोर परिश्रम व चिकाटीने त्याही पुढे जात आज ती न्यायाधीश बनली आहे.

The daughter of the mother-in-law worker asked the judge | सांगतील ऊसतोड मजुराची मुलगी बनली न्यायाधीश

सांगतील ऊसतोड मजुराची मुलगी बनली न्यायाधीश

Next

जत (जि. सांगली) : अन्नपूर्णा ईश्वर आवटी. उमराणी (ता. जत) येथील ऊसतोडणी मजुराची मुलगी. कठिण परिस्थितीतून शिक्षण घेताना वकील होण्याचे स्वप्न बाळगले. कठोर परिश्रम व चिकाटीने त्याही पुढे जात आज ती न्यायाधीश बनली आहे.
घरची परिस्थिती हलाखीची असल्याने वडील मजुरीसाठी चिप्री (ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) येथे गेले. त्यांच्याबरोबर कुटुंबही स्थलांतरित झाले. त्यामुळे अन्नपूर्णाचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिप्री येथेच झाले. आई-वडिलांची तसेच उमराणी गावातील बोलीभाषा कन्नड असली तरी, अन्नपूर्णा मराठीत शिकली. आई-वडिलांनी मोलमजुरी करून तिला शिक्षण पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन दिले. तिने दिवस-रात्र मेहनत घेतली. सतत निर्माण होणा-या अडचणींना धैर्याने तोंड देत कायद्याची पदवी मिळवली. वकील झाल्यानंतर प्रशिक्षणासाठी कोल्हापूर न गाठता तिने तालुक्याला प्राधान्य दिले. प्रॅक्टीस करीत असताना लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा देऊन ती न्यायाधीश बनली. परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी वर्षभर ती पुण्यात राहिली होती.

Web Title: The daughter of the mother-in-law worker asked the judge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.