शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

मालगावात जमीन हडपण्याचा ‘दास’चा प्रयत्न हाणून पाडला

By admin | Updated: July 7, 2016 00:28 IST

ग्रामपंचायतीची कारवाई : ताबा घेऊन जागेत वृक्षारोपण

मालगाव : आ. सुरेश खाडे यांचा विरोध झुगारून बुधवारी मिरज-पंढरपूर राज्यमार्गावर असलेल्या गायरान जमिनीचा मालगाव ग्रामपंचायतीने ताबा घेतला. ताबा घेतलेल्या जमिनीवर ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी वृक्षारोपण केले. ग्रामपंचायतीच्या पवित्र्यामुळे जमीन कब्जात घेण्याचा आ. खाडे यांचा प्रयत्न असफल ठरला आहे. मिरज-पंढरपूर मार्गालगत मालगाव हद्दीतील गट नं. २२४३ व २२४७ मध्ये सुमारे ९ एकर गायरान जमीन आहे. राज्यमार्गालगत असलेल्या कोट्यवधी रुपये किमतीच्या या जमिनीवर अनेकांचा डोळा होता. मात्र तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी ऐनवेळी केलेल्या ठरावामुळे आ. खाडे यांच्या दास बहुउद्देशीय संस्थेला गट नं. २२४३ मधील १ हेक्टर ९० आरपैकी १ हेक्टर ३१ व गट नं. २२४७ मधील १ हेक्टर ६२ आरपैकी ८० आर अशी एकूण पाच ५ एकर ११ गुंठे ही कोट्यवधी रुपयांची जमीन देण्यात आली आहे. शासन स्तरावर या जमिनीचे दास संस्थेकडे हस्तांतरण झाल्याने मोठा वादंगही झाला होता. मात्र आ. खाडे यांच्या दास बहुउद्देशीय संस्थेने ५ एकर ११ गुंठ्यावर ताबा घेऊन शिक्षण संस्थेसाठी इमारतीचे बांधकाम केले आहे. मात्र त्यांनी गायरानच्या सर्व क्षेत्राला कुंपण घातल्याने भविष्यात आ. खाडे यांच्याकडून शिल्लक जमीनही हडप करण्याचा प्रयत्न असल्याचा ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचा आरोप आहे. उर्वरित खाडे यांच्या संस्थेने कुंपण घातलेली साडेतीन एकर जमीन ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्याच्या मागणीचा ग्रामसभेत ठरावही केला आहे. बुधवारी ग्रामपंचायतीने आ. खाडे यांचा विरोध झुगारून रस्त्याकडेला असलेल्या साडेतीन एकर जमिनीचा ताबा घेतला. ग्रामपंचायतीचे सत्ताधारी गटाचे नेते व जि. प. सदस्य आप्पासाहेब हुळ्ळे, सरपंच प्रशांत माळी, गटनेते प्रदीप सावंत यांच्यासह सदस्यांनी या जमिनीवर वृक्षारोपण केले. ग्रामपंचायतीच्या जमिनीत वृक्ष लागवडीचे काम सुरू करण्यात आले आहे. (वार्ताहर) घरकुल योजना राबविणार : सरपंच, उपसरपंच मालगावचा विस्तार वाढत आहे. अनेक गरीब कुटुंबांना जागेअभावी घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही. ग्रामपंचायतीच्या ताब्यात असणाऱ्या तीन एकर जमिनीवर सध्या वृक्ष लागवड सुरू आहे. भविष्यात या जागेवर भक्तनिवास व घरकुल योजना राबविण्यात येणार आहे. पारधी समाजाच्या पुनर्वसनासाठी या जागेचा वापर करावा, अशी सदस्यांची मागणी असल्याचे सरपंच प्रशांत माळी व उपसरपंच राजू भानुसे यांनी सांगितले.