दर्शन पाटीलची महाराष्ट्राच्या वरिष्ठ व्हॉलिबॉल संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2021 04:26 IST2021-03-06T04:26:01+5:302021-03-06T04:26:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : येथील इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या दर्शन पोपट पाटील याची वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉल ...

Darshan Patil selected in Maharashtra's senior volleyball team | दर्शन पाटीलची महाराष्ट्राच्या वरिष्ठ व्हॉलिबॉल संघात निवड

दर्शन पाटीलची महाराष्ट्राच्या वरिष्ठ व्हॉलिबॉल संघात निवड

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील इस्लामपूर व्यायाम मंडळाच्या दर्शन पोपट पाटील याची वरिष्ठ गटाच्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या व्हॉलिबॉल संघात दुसऱ्यांदा निवड झाली. ओरिसातील भुवनेश्वर येथे ५ ते ११ मार्च दरम्यान होणाऱ्या स्पर्धेसाठी तो रवाना झाला. तो क्रीडा कारकिदीर्तील दहावी राष्ट्रीय स्पर्धा खेळत आहे.

दर्शन पाटील याने १६, १७, १९ आणि २१ वर्षे वयोगटातून स्कूल आणि फेडरेशन स्तरावरील केरळ, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश अशा राज्यातील राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. १६ वर्षीय कुमार संघाचा तो सलग दोन वर्षे महाराष्ट्राचा कर्णधार होता. जुन्या काळातील राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू दिवंगत मधुकर पाटील यांचा तो नातू, तर शिवछत्रपती पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय कबड्डी प्रशिक्षक पोपट पाटील यांचा मुलगा आहे. जिल्हा व्हॉलिबॉल संघटनेचे अध्यक्ष प्रतीक पाटील यांनी त्याचे अभिनंदन केले. त्याला वरिष्ठ प्रशिक्षक प्रकाश पाटील, राजेंद्र सातपुते, क्रीडाधिकारी जमीर अत्तार, सुहास जगताप, प्रा. डॉ. संदीप पाटील, अमोल खोत यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Darshan Patil selected in Maharashtra's senior volleyball team