ऐन दिवाळीत फराळामध्ये भेसळीचा धोकादायक डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 05:37 PM2019-10-25T17:37:30+5:302019-10-25T17:38:09+5:30

या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे.

Dangerous adulteration of adulteration in the open bankruptcy | ऐन दिवाळीत फराळामध्ये भेसळीचा धोकादायक डाव

ऐन दिवाळीत फराळामध्ये भेसळीचा धोकादायक डाव

Next
ठळक मुद्देमिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरंच चांदीचा की अ‍ॅल्युमिनियमचा असतो, यापासून भेसळीला सुरुवात होते.

शरद जाधव ।
सांगली : भारत वर्षातील सर्वात मोठा आणि कुटुंबामध्ये आनंद घेऊन  येणारा सण म्हणजे दिवाळी. लक्ष- लक्ष दिव्यांनी उजळून टाकणाºया या सणाचे प्रमुख आकर्षण असते ते फराळाचे पदार्थ. मात्र, या पदार्थांमध्ये भेसळ करत भेसळखोरांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविला आहे. दिसायला आकर्षक वाटणाºया तयार फराळाच्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार होत असून, फराळाची तयारी करताना जागरूकता आवश्यक आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर कारवाई सुरू केली असून, ऐन दिवाळीतही त्यांची करडी नजर असणार आहे. बाजारपेठेत दिवाळीसाठी फराळाच्या पदार्थांनाही मागणी असते. सध्या घरात फराळाचे पदार्थ तयार करण्यापेक्षा विकतचे पदार्थ विकत आणण्यावर भर दिला जातो. मात्र, काही नामांकित मिठाई दुकानदारांचा अपवाद वगळता,   अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाईच नागरिकांच्या माथी मारली जात आहे. आकर्षक पॅकिंग आणि रंगामुळे नागरिकांनाही, आपण भेसळ असलेली मिठाई घेतल्याचे कळतही नाही; पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, अपचन, त्वचेचे विकार सुरू झाल्यानंतर मग भेसळीचा प्रकार समोर येतो.

मिठाईच्या पदार्थांमध्ये विशेषत: दुधापासून बनविलेली मिठाई, बेसनपासून बनविण्यात येणाºया पदार्थांमध्ये भेसळ वाढत आहे. मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरंच चांदीचा की अ‍ॅल्युमिनियमचा असतो, यापासून भेसळीला सुरुवात होते.

या मिठाईत वापरण्यात येणारा खवा दुधापासूनचा बनवलेला असतो, की बटाट्याचा, याबाबतही साशंकता येत असते. शुध्द तुपात तळलेले पदार्थ म्हणून वनस्पती तेलात तळून दिलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे.

Web Title: Dangerous adulteration of adulteration in the open bankruptcy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.