रस्त्यावर वाहने उभारल्याने धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:14+5:302020-12-05T05:05:14+5:30

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या मुख्य रस्त्यांवर ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर व अन्य मोठी वाहने रात्रभर थांबत असल्याने अपघाताचा ...

Danger of parking vehicles on the road | रस्त्यावर वाहने उभारल्याने धोका

रस्त्यावर वाहने उभारल्याने धोका

सांगली : गेल्या काही दिवसांपासून सांगलीच्या मुख्य रस्त्यांवर ट्रक, टेम्पो, ट्रॅक्टर व अन्य मोठी वाहने रात्रभर थांबत असल्याने अपघाताचा धोका वाढला आहे. या वाहनांवर कारवाईची मागणी होत आहे.

शहरात सांगली-माधवनगर, बायपास रस्ता, जुना बुधगाव रस्ता याठिकाणी सर्वाधिक वाहने रात्री उभी केली जातात. वाहनांच्या मागे रिफ्लेक्टर नसल्याने मागून येणाऱ्या वाहनांना ही वाहने अंधार असल्याने दिसत नाहीत. त्यामुळे अपघात होतात. गेल्या काही वर्षात अशा अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे आताही त्याचा धोका वाढला आहे. अनलॉकनंतर मुख्य बाजारात अन्य राज्यातून, जिल्ह्यातून येणारी वाहने रात्री रस्त्यावरच थांबविली जातात. त्यामुळे सध्या अशा वाहनांची रस्त्यावर गर्दी होत आहे.

Web Title: Danger of parking vehicles on the road