शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्षावर ‘भुरी’चा धोका वाढला : जत तालुक्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:10 IST

जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले

ठळक मुद्देवातावरण बदलाचा परिणाम; शेतकऱ्यांची चिंता वाढली

गजानन पाटील ।संख : जत तालुक्यात सध्या वातावरणात बदल होत आहे. याचा परिणाम द्राक्षांवर होत असून, भुरी रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. तसेच द्राक्षाचा गोडवा कमी झाला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.

यातच व्यापारी पाऊस पडण्याची भीती दाखवून द्राक्षे कमी दरात घेत आहेत. यामुळे ‘दुष्काळात धोंडा महिना’ अशी अवस्था झाली आहे. द्राक्ष बागायतदार दुहेरी संकटात सापडला आहे.जत तालुक्यामध्ये ६ हजार ६७० हेक्टर क्षेत्रावर द्राक्षबागा आहेत. प्रतिकूल परिस्थितीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत उजाड माळरानावर बागा उभ्या केल्या आहेत. कृषी विभागाच्या अनुदानावर व स्वत: लाखो लिटरची शेततळी बांधली आहेत. पाण्याचा नियोजनबध्द वापर करून दर्जेदार द्राक्षांचे उत्पादन घेतले जाते. यावर्षी पाऊसच नसल्याने गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.

१४४ मिलिमीटर पाऊस झाला आहे. पूर्व व दक्षिण भागातील २६ पैकी १७ तलाव व दोन मध्यम प्रकल्प मे-जून महिन्यापासून पाण्याअभावी कोरडे पडलेले आहेत. विहिरी, तलाव कोरडे पडल्याने शेतकºयांनी टॅँकरने पाणी घालून बागा जगविल्या आहेत. पाण्यासाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. सध्या दाक्षे विक्रीला आली आहेत.

यंदाच्या द्राक्ष हंगामाच्या सुरुवातीलाच बागा फुलोºयात असताना, अवकाळी पावसाचा फटका बसला होता. परतीच्या मान्सून पावसाने दडी दिली होती. शेतकºयांनी दुष्काळाच्या अस्मानी संकटाचा सामना करून द्राक्षबागा फुलवल्या आहेत. जानेवारी महिन्याच्या मध्यापर्यंत वातावरण चांगले होते. मात्र गेल्या आठवड्यापासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने द्राक्ष उत्पादन शेतकºयांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

काय होत आहेत परिणाम...सध्या द्राक्षे विक्रीला सुरुवात झालेली आहे. वातावरणातील बदलांमुळे विक्रीला आलेल्या द्राक्षातील गोडवा उतरू लागला आहे.कमी वजन भरत आहे. बेदाणा उत्पादन घटणार आहे. गोडी कमी होणार आहे. बेदाणा चपटा होणार आहे.कच्च्या द्राक्षाच्या मण्यांवर आणि विक्रीला आलेल्या द्राक्षांच्या देठावर भुरी रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.बागायतदार शेतकऱ्यांनी औषध फवारणी सुरू केली असल्याचे चित्र आहे. 

व्यापाºयांनी दर पाडलासध्या ढगाळ वातावरण असल्याने पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे व्यापारी शेतकºयांना सांगू लागले आहेत. याचा फायदा घेऊन कमी दरात द्राक्षांची खरेदी करण्याचा घाट व्यापाºयांनी घातला आहे. १८ जानेवारीपर्यंत ३८ रुपये किलो दर होता. सध्या ३२ ते ३४ रुपये आहे. त्यामुळे बागायतदार शेतकरी चिंतातूर झाला आहे.भूलथापांना बळी पडू नकाव्यापारी पावसाची भीती घालत आहेत. व्यापाºयांच्या भूलथापांना बळी पडू नका. कमी दरात द्राक्षाची विक्री करू नका, असे आवाहन द्राक्ष संघाच्यावतीने केले आहे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी