पेठ येथून दाेन म्हैशी व गाय लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:23 IST2021-01-02T04:23:42+5:302021-01-02T04:23:42+5:30

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) हद्दीत महामार्गाच्या पूर्वेस असणाऱ्या शेतातील गाेठ्यातून अज्ञात चोरट्याने १ गाय आणि २ म्हैशींची चोरी ...

Daen buffalo and cow lampas from Peth | पेठ येथून दाेन म्हैशी व गाय लंपास

पेठ येथून दाेन म्हैशी व गाय लंपास

इस्लामपूर : पेठ (ता. वाळवा) हद्दीत महामार्गाच्या पूर्वेस असणाऱ्या शेतातील गाेठ्यातून अज्ञात चोरट्याने १ गाय आणि २ म्हैशींची चोरी केली. या जनावरांची अंदाजे किंमत ६० हजार रुपये आहे. चोरीची ही घटना २९ डिसेंबरच्या रात्री ते पहाटेदरम्यान घडली.

याबाबत डॉ. सुयोग बजरंग शेटे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांचे महामार्गाच्या पूर्वेस शेत असून, त्याचठिकाणी जनावरांचा गोठा आहे. तानाजी कदम हे या जनावरांची देखभाल करतात. घटनेच्या २८ डिसेंबर राेजी सायंकाळी जनावरांची धार काढून गोठ्याला कुलूप लावून ते घरी आले होते. दुसऱ्यादिवशी सकाळी ते शेतात गेले. गोठ्यात पाहणी केल्यावर त्यांना तीन जनावरे दिसली नाहीत. ही माहिती त्यांनी डॉ. शेटे यांना दिली. दोघांनी परिसरात शोध घेतला; मात्र जनावरे मिळून आली नाहीत. अखेर त्यांनी इस्लामपूर पाेलीस ठाण्यात जनावरांच्या चाेरीची फिर्याद दिली.

Web Title: Daen buffalo and cow lampas from Peth