वाकुर्डे योजनेचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:27 IST2021-03-10T04:27:38+5:302021-03-10T04:27:38+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई धरणातील पाणीसाठा संपत आला असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ...

The cycle of the Wakurde scheme begins | वाकुर्डे योजनेचे आवर्तन सुरू

वाकुर्डे योजनेचे आवर्तन सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक येथील करमजाई धरणातील पाणीसाठा संपत आला असल्यामुळे आणि शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वाकुर्डे बुद्रुक योजनेचे खिरवडे पंप हाऊस शुक्रवारी सुरू करण्यात आले. मंगळवारी दोन विद्युत मोटारींच्या साहाय्याने हत्तेगाव येथून करमजाई धरणात पाणी पोहोचले आहे.

पिण्याचे पाणी आणि शेतीच्या पाण्याची मागणी होऊ लागल्याने तसेच करमजाई धरणातील पाणी कमी झाल्याने वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे दोन पंप हाऊस सुरू करण्यात आले आहेत. तीन दिवसांपूर्वी हातेगाव येथील तलावात पाणी आले असून, मंगळवारी करमजाई धरणात पाणी सोडण्यात आले. ते भरल्यानंतर पुढे कालव्याद्वारे शिराळा आणि कऱ्हाड तालुक्यात सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे अधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: The cycle of the Wakurde scheme begins