शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
3
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
4
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
5
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
6
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
7
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
8
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
9
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
10
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
11
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
12
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
13
शरद पवारांंची तब्येत बिघडल्याने हेमंत ढोमेचं भावूक आवाहन, म्हणाला - "आपली मेहनत घेण्याची क्षमता..."
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2021 6:37 PM

Irrigation Projects Sangli- मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिंलिंद नाईक,कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देम्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरूजलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती मागणी

म्हैसाळ : मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्या हस्ते बटन दाबून आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यात आले.यावेळी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता मिंलिंद नाईक,कार्यकारी अभियंता सुर्यकांत नलवडे प्रमुख उपस्थित होते.सध्या उन्हाची दाहकता वाढत चालली आहे.त्यामुळे शेतीला पाणी टंचाई निर्माण झाली होती.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची पिके वाळून चालली असल्याने म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करावी अशी मागणी मनोज शिंदे-म्हैसाळकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार मनोज शिंदे-म्हैसाळकर यांनी शेतकऱ्यांची ही समस्या जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मांडून लवकरात लवकर पाणी सोडण्याची विनंती केली होती.त्यानुसार आज म्हैसाळचे पंप सुरू करण्यात आले.

यावेळी जिल्हा मध्यवर्ती बंकेचे संचालक बाळासाहेब होनमोरे, तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष तानाजी दळवी,युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष शिवाजीराव महाडिक, कार्यध्यक्ष वास्कर शिंदे, मिरज विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष प्रमोद इनामदार, विधानसभा क्षेत्राचे कार्यध्यक्ष गंगाधर तोडकर, सलगरेचे उपसरपंच सुरेश कोळेकर, युवक राष्ट्रवादीचे कार्यध्यक्ष महावीर खोत, मिडीया प्रमुख पृथ्वीराज सावंत, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

सध्या उन्हाळा मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतातील विहीर व कुंपननलिका यांच्या पाणी पातळीत दिवसेंदिवस घट होत आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी म्हैसाळ योजनेचे आवर्तन लवकरात लवकर सुरू करावी अशी मागणी माझ्याकडे केली होती. त्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे हा प्रश्न मांडला होता. त्यानुसार आज म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू केले.- मनोज शिंदे-म्हैसाळकरअध्यक्ष, मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना

टॅग्स :Irrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पSangliसांगलीmiraj-acमिरज