शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

स्कूल बसखाली चिरडून बालक ठार-: बालदिनी काळाचा घाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 19:13 IST

मन्वतसाई याच्या घरानजीक बस (क्र. एमएच १०, के ९०५१) आली. तो बसमध्ये बसल्यावर बस जाऊ लागली. याचवेळी कुषवंतसाई आजीचा हात सोडून बसच्या पुढील बाजूस गेला आणि बसखाली सापडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बस जागीच थांबली. कुषवंतसाईच्या डोक्यास जोरदार मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.

ठळक मुद्दे सांडगेवाडीची घटना

पलूस : सांडगेवाडी (ता. पलूस) येथे स्कूल बसखाली चिरडून दोनवर्षीय बालक ठार झाले. कुषवंतसाई श्रीधर वल्लभनेने असे त्याचे नाव आहे. ही घटना गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास घडली. याप्रकरणी कुषवंतसाईची आजी पुष्पावती वल्लभनेने यांनी पलूस पोलिसात फिर्याद दिली आहे. स्कूल बसचालकावर गुन्हा दाखल झाला आहे. बालदिनीच घडलेल्या या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

गुड्डावल्लेरु (जि. कृष्णा, आंध्र प्रदेश) येथील श्रीधर व्यंकटेश्वरा वल्लभनेने पलूस येथे महामार्गाच्या कामावर गेल्या दोन वर्षापासून उपव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत. ते कुटुंबासह सांडगेवाडी येथे भाड्याच्या घरात राहत आहेत. त्यांना मन्वतसाई (वय ७) आणि कुषवंतसाई (२) ही दोन मुले आहेत. यातील मन्वतसाई पलूस येथील शाळेत दुसरीत शिकत आहे. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास मन्वतसाई शाळेला बसमधून जाण्यासाठी निघाला होता. त्यावेळी त्याला सोडण्यासाठी आजी पुष्पावती व भाऊ कुषवंतसाई सोबत आले होते.

मन्वतसाई याच्या घरानजीक बस (क्र. एमएच १०, के ९०५१) आली. तो बसमध्ये बसल्यावर बस जाऊ लागली. याचवेळी कुषवंतसाई आजीचा हात सोडून बसच्या पुढील बाजूस गेला आणि बसखाली सापडला. त्याच्या ओरडण्याचा आवाज आल्याने बस जागीच थांबली. कुषवंतसाईच्या डोक्यास जोरदार मार बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता.चालकावर गुन्हाया घटनेनंतर कुषवंतसाईच्या कुटुंबीयांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनास्थळी बघ्यांची गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलीस तेथे आले आणि त्यांनी चालकाला ताब्यात घेतले. याबाबत पुष्पावती यांनी पलूस पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून बसचालक अविनाश पांडुरंग पाटील (२७, रा. घोगाव, ता. पलूस) याच्याविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

टॅग्स :Accidentअपघातchildren's dayबालदिनDeathमृत्यूSangliसांगली