शहरं
Join us  
Trending Stories
1
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
2
आजचे राशीभविष्य - १ मे २०२४; आर्थिक लाभ संभवतात अन् नशिबाची साथ लाभेल
3
वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिलासा! 'कोविशिल्ड' घेतलेल्यांनी चिंता करू नये; टीटीएस आजार होणे ही दुर्मीळ घटना
4
भाजपचा नवा गेमप्लान, टप्प्यानुसार वेगळे मुद्दे ! कमी मतदानानंतर चिंता वाढली; प्रचाराची नव्याने आखणी
5
महाविकास आघाडीचे मुंबईत 'मराठी कार्ड' सर्व सहाही उमेदवार मराठी; महायुतीकडून चार मराठी
6
भयंकर : प्रसूतीवेळी वीज गेली, टॉर्चच्या प्रकाशात सिझर; बाळासह आईचा मृत्यू
7
वर्षा गायकवाड यांच्या रॅलीला उद्धवसेनेचे पाठबळ, नसीम खान, भाई जगताप नाराज?
8
लखपतीचे झाले करोडपती पण, उमेदवाराकडे "ना बंगला, ना गाडी"
9
वैशाली दरेकर यांच्या मालमत्तेत २३ लाखांची वाढ; कर्ज नाही, स्वतःचे वाहन नाही
10
किळस अन् कलंक; विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला
11
पीयूष गोयल यांच्या संपत्तीत २ वर्षांत १०.६१ कोटींची भर;एकही गुन्हा दाखल नाही
12
यूपीत 'एमडी'चा कारखाना उद्ध्वस्त, सहा जणांना ठोकल्या बेड्या; ठाणे पोलिसांनी जप्त केला २० कोटींचा मुद्देमाल
13
बलात्कारानंतर जन्मलेल्या बाळाची केली विक्री; मुलीच्या आई-वडिलांसह १६ जणांवर गुन्हा
14
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
15
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
16
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
17
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
18
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
19
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
20
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती

झेंडूचा दर दोनशे रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 11:35 PM

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडूने दोनशे रुपयांचा पल्ला गाठल्याने गुरुवारी उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला. सकाळी शंभर ते सव्वाशे रुपये दर असलेला झेंडू दुपारनंतर चांगलाच वधारला. सायंकाळपर्यंत तर बाजारपेठेतील झेंडूची फुलेच संपली होती.दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. दरवर्षी लक्ष्मीपूजनाआधीच सांगलीच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक मोठ्याप्रमाणात झालेली असते. यंदा मात्र ...

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर झेंडूने दोनशे रुपयांचा पल्ला गाठल्याने गुरुवारी उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला. सकाळी शंभर ते सव्वाशे रुपये दर असलेला झेंडू दुपारनंतर चांगलाच वधारला. सायंकाळपर्यंत तर बाजारपेठेतील झेंडूची फुलेच संपली होती.दिवाळीत लक्ष्मीपूजनाला विशेष महत्त्व असते. दरवर्षी लक्ष्मीपूजनाआधीच सांगलीच्या बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक मोठ्याप्रमाणात झालेली असते. यंदा मात्र बाजारपेठेत झेंडूची आवक कमी होती. बुधवारपासून विक्रेत्यांनी मारुती चौक, हरभट रोड, कापड पेठ, कॉलेज कॉर्नर, वखारभाग परिसरात झेंडूची विक्री सुरू केली होती, पण विक्रेत्यांकडे थोडाच माल होता.यंदा पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली होती. त्याचा परिणाम झेंडूच्या उत्पादनावर झाला आहे. झेंडूची फुले ऐन बहरात आली असतानाच मुसळधार पावसाने झोपडले. त्यामुळे फूलकळी गळून गेली. तसेच बहरलेली फुलेही काळी पडली. त्यात शेतात गुडघाभर पाणी साचून राहिल्याने अनेक उत्पादकांना सणासुदीत झेंडूची तोड करता आली नाही. त्यामुळे बाजारपेठेत झेंडूची अपेक्षित आवक होऊ शकली नाही.गुरुवारी सकाळी सांगलीत झेंडूचा दर १२० ते १५० रुपये किलो होता. दुपारपर्यंत झेंडूच्या दराने २०० रुपयांपर्यंत मजल मारली होती. सायंकाळनंतर तर बाजारपेठेत झेंडूच शिल्लक नव्हता.झेंडूसोबतच नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट, ऊस यालाही मोठी मागणी होती. नारळाच्या झावळ्यांची जोडी ७० ते १५० रुपयांना होती. केळीचे लहान खुंट ५० रुपये जोडी, तर मोठे खुंट ३०० रुपये जोडी दराने विकले जात होते. केळीच्या घडासह खुंट ६०० रुपये जोडी होती. उसाची जोडी ३० रुपये होती. झेंडू, नारळाच्या झावळ्या, केळीचे खुंट, ऊस खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.