शेटफळेत बाकांवर वंगण ओतून गर्दी काळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:49+5:302021-05-01T04:24:49+5:30

करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असूनही नागरिकांत बेफिकिरी वाढत आहेत. गावत अनेक ठिकाणी गप्पांचे फड ...

The crowd was blackened by pouring grease on the sheets | शेटफळेत बाकांवर वंगण ओतून गर्दी काळली

शेटफळेत बाकांवर वंगण ओतून गर्दी काळली

करगणी : आटपाडी तालुक्यातील शेटफळे गावात कोरोनाचे रुग्ण वाढत असूनही नागरिकांत बेफिकिरी वाढत आहेत. गावत अनेक ठिकाणी गप्पांचे फड रंगत आहेत. त्यावर शेटफळे ग्रामपंचायतीने नामी शक्कल लढवत ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ जास्त आहे अशा ठिकाणी बसणाऱ्या जागेवर वंगण ओतून बसण्याच्या जागाच बंद केल्या आहेत.

शेटफळेत सध्या कोरोना संसर्गजन्य रुग्णसंख्या वाढत असताना ग्रामपंचायत प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन समितीने नागरिकांना वेळोवेळी विनंती करूनही नागरिक पारावर, कट्यावर, बाकड्यावर बसतच होते. त्यामुळे ग्रामपंचायत व आपत्ती व्यवस्थापन समितीने चौका-चौकांत बसणाऱ्या नागरिकांना आळा बसण्यासाठी तेथील दुकानांचे कट्टे, विविध ठिकाणी बसायला ठेवलेली बाके या सर्वच ठिकाणी ऑईल ओतले आहे. बसण्याचे अड्डे अशारीतीने बंद केल्याने आता या ठिकाणी दररोज बसायला येणारी मंडळी आलीच नाही. यामुळे ग्रामपंचायतीने राबविलेला उपक्रम यशस्वी झाला.

गर्दीच्या ठिकाणी जर नागरिकांना बसायला कोरोनाकाळात बंदी केली तर, काही प्रमाणात कोरोनाला अटकाव होणार आहे.

Web Title: The crowd was blackened by pouring grease on the sheets