शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
3
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
4
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
5
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्तूत्तर...
6
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
7
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
8
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
9
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
10
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
11
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आष्ट्यात घोडी, पिसेचा खेळ पाहण्यास भाविकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2019 11:17 PM

आष्टा (ता. वाळवा) येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात रविवारी रात्री घोडीचा खेळ रंगला, तर सोमवारी दिवसभर पिसेचा खेळ झाला. मंगळवारी देवी जोगण्याच्या रूपात

ठळक मुद्देभावई उत्सव : आज देवी जोगण्याच्या रूपात येऊन दैत्याचा शोध घेणार; खेळांनी भरला शहरात रंग

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील श्री चौंडेश्वरी देवीच्या भावई उत्सवात रविवारी रात्री घोडीचा खेळ रंगला, तर सोमवारी दिवसभर पिसेचा खेळ झाला. मंगळवारी देवी जोगण्याच्या रूपात दैत्याचा शोध घेणार आहे. हा खेळ पाहण्यास भाविकांची गर्दी होत आहे.

उत्सवात देवीने दैत्याचा शोध घेऊन त्याला ठार मारले. दीपपूजन, कंकणविधी, आळुमुळू झाल्यानंतर रविवारी रात्री घोडी हा पारंपरिक खेळ झाला. दैत्याचा शोध घेण्याकरिता कुंभार, सुतार, चांभार, जाधव इतर खेळगडी, मानकरी यांच्यासमवेत दिव्याच्या उजेडात बाहेर पडले. सोंगी भजनामध्ये किंवा कलानृत्य प्रकारातील सजवलेला लाकडी घोडा व पाठीमागे बोराटीचे कृत्रिम शेपूट होते. या वेशभूषेत कुंभारवाडा व सुतार वाड्यातून दोन घोडी बाहेर पडली. मारुती मंदिरापासून या खेळास सुरुवात झाली. घोड्याच्या खेळाच्या पुढे जाधव मानकऱ्यांनी पारंपरिक विनोदी गाणी गायिली. या घोडीच्या शेपटीला बांधलेल्या बोराटीच्या काट्यापासून सर्वजण वाचण्याचा प्रयत्न करीत होते. या घोडीची गावातील थोरात, पाटील, कुलकर्णी, महाजन याठिकाणी पूजा झाल्यानंतर मध्यरात्री हा खेळ संपला.

सोमवारी सकाळी पिसेचा खेळ सुरु झाला. दोन कुंभार, एक गुरव व दोन जाधव अशी पाच पिसे होती. त्यांच्या अंगावर कमरेपर्यंत चोळणा, कमरेला घंटी, एका हातात उंच काठी व दुसºया हातात लिंबाचा झुबका. त्यांच्या तोंडाला काळे फासून हाता-पायावर भस्म व हळदीचे पट्टे ओढून डोक्याला कापसाचे पुंजके लावले होते. मिरज वेसजवळील चौगुले मळ्यात दैत्य रूपातील पिसेला रंगवण्यात आले. सर्व पाच पिसे दिवसभर घरोघरी फिरले.तोरणाला स्पर्श करीत कर तोडला...पिसे घराच्या उंबºयावर ठेवलेल्या गूळ पाण्यात हातातील लिंबाचा झुबका बुडवून उंबºयावर आपटला. या पिसेला गूळ-खोबरे व धान्य देण्यात आले. सायंकाळी मिरजवेस येथे उंचावर लिंबाच्या डहाळीचे उंच तोरण बांधले होते. खालील बाजूला अग्नि पेटविण्यात आला. या पाच पिसेनी या अग्नीवरून उडी मारून काठीने लिंबाच्या तोरणाला स्पर्श केला व कर तोडला.

 

टॅग्स :Sangliसांगली