आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:59+5:302021-05-07T04:28:59+5:30

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरोना लसीकरण सुरू झाले. मात्र ३०० नागरिकांना लस दिल्यानंतर ते थांबले ...

Crowd for corona vaccination at Ashta Rural Hospital | आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी गर्दी

आष्टा ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी गर्दी

आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालयात तीन दिवसांच्या प्रतीक्षेनंतर कोरोना लसीकरण सुरू झाले. मात्र ३०० नागरिकांना लस दिल्यानंतर ते थांबले आहे. लसीकरणासाठी रुग्णालयात गर्दी होत आहे.

आष्टा शहराची लोकसंख्या सुमारे ३५ ते ४० हजार आहे. लसीकरणाने वेग घेतला असतानाच मागील तीन दिवसांपासून लसीकरण थांबले होते. बुधवारी दुपारी सुमारे ३०० नागरिकांसाठी लस उपलब्ध झाली. यातील सुमारे १४० लोकांना बुधवारी, तर उर्वरित १६० जणांना गुरुवारी दुपारपर्यंत लस देण्यात आली. लस देतेवेळी आलेल्या नागरिकांना टोकन देण्यात आले होते. पहिल्यावेळी लस घेणाऱ्यांसाठी वेगळी व दुसऱ्यावेळी लस घेणाऱ्यांसाठी वेगळी रांग करण्यात आली होती. ग्रामीण रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. संतोष निगडी, डी. बी. कांबळे, नीलम लोहार, नकुशा भुसनर यांनी लसीकरण केले. दुपारनंतर लसीकरण थांबले.

फोटो :

आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना लसीकरणासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Web Title: Crowd for corona vaccination at Ashta Rural Hospital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.