शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई; बलुचिस्तानचा स्वतंत्र उल्लेख केल्यानं 'शहबाज' सरकार बिथरलं
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
5
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
6
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
7
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
8
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
9
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
10
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
11
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
12
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
13
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
14
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
15
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
16
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
17
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

Sangli: अवकाळीच्या फटक्याने ११७ गावांतील पिके आडवी, कोणत्या तालुक्यांत सर्वाधिक नुकसान.. वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 18:52 IST

सहाशे शेतकऱ्यांचे नुकसान 

सांगली : आठवड्यापूर्वी झालेल्या मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यातील ११७ गावांतील ६०४ शेतकऱ्यांच्या दोनशे हेक्टर फळ आणि बागायती पिकांना फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने काढला आहे. कृषी आणि महसूलने पंचनामेही सुरू केले आहेत.यावर्षी मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली. वादळी वारे आणि मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान झाले. यावर्षी प्रथमच मे महिन्यातील १४ दिवस पावसाचे ठरले. या महिन्यात जिल्ह्यात सरासरी २३८ मिलिमीटर एवढा विक्रमी पाऊस झाला. शेतशिवारांमध्ये जिरायती पिके नसली तरी अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी भाजीपाला, फळबागांसह अन्य पिके घेतली होती. बागायती पिकेही आहेत. उन्हाळ्यातील पाणीटंचाईचा सामना करीत शेतकऱ्यांनी बागा जगविल्या होत्या. मात्र, मागच्या दोन आठवड्यात झालेल्या पावसाने बागायती आणि फळपिकांची नासाडी केली आहे. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची मदत मिळते की नाही, अशी शंका शेतकऱ्यांतून व्यक्त होत होती. मात्र शासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई मिळेल, अशी आशा शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. या अंदाजानुसार ११७ गावे बाधित असून, ६०४ शेतकऱ्यांचे २१० हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे.

अवकाळी पिकांचे नुकसान (क्षेत्र हेक्टरमध्ये)तालुका - शेतकरी - गावे - क्षेत्रमिरज - ४४ - १० -१९तासगाव - २६ - ०७ - ०९क.महांकाळ - ४४ - १५ - २३वाळवा - ७० - १६ - १७शिराळा - २६४ - २२ - ४४पलूस - ६३ - १५ - २७कडेगाव - ५५ - १७ - २३खानापूर - ०६ - ०३ - ०६आटपाडी - १७ - ०५ - १६जत - १५ - ०७ - ०९

शिराळा, वाळवा तालुक्यांत सर्वाधिक नुकसानशिराळा, वाळवा, पलूस, मिरज तालुक्यांत बागायती पिकांचे क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे अवकाळी पावसाचा फटका याच तालुक्यांना सर्वाधिक बसतो. शिराळा तालुक्यातील २६४ शेतकऱ्यांचे २२ गावांतील ४३ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच वाळवा तालुक्यातील ७० शेतकऱ्यांचे १७ हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :SangliसांगलीRainपाऊसFarmerशेतकरी