शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपुरात 'पीकविमा' व्यवस्थापकाला मारहाण, तालुका कृषी अधिकारी कार्यालयात घडला प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2024 18:32 IST

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील शेतकऱ्यांकडे पीकविमा पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला आमदार बच्चू कडू प्रणीत प्रहार शेतकरी संघटनेचे ...

इस्लामपूर : इस्लामपूर शहरातील शेतकऱ्यांकडे पीकविमा पंचनाम्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या कंपनीच्या व्यवस्थापकाला आमदार बच्चू कडू प्रणीत प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख दिग्विजय पाटील यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच चोप दिला. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.उरूण परिसरातील शेतकरी पांडुरंग हरी पाटील, लक्ष्मण हरी पाटील यांच्या शेतातील सोयाबीन पिकाचा १ रुपया भरून शासनाच्या धोरणानुसार पीकविमा काढला होता. सततच्या अतिवृष्टीमुळे या सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने नियुक्त केलेल्या पीकविमा कंपनीचे अधिकारी नुकसान झालेल्या पिकाचा पंचनामा करण्यासाठी शेतकऱ्यांकडे आले होते. यातील दोघांनी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी केल्याची तक्रार प्रहारच्या दिग्विजय पाटील यांच्याकडे आली होती.पाटील यांनी तालुका कृषी अधिकारी इंद्रजित चव्हाण यांच्या कार्यालयात येऊन पीक विम्याच्या पंचनामा पद्धतीबाबत विचारणा केली. त्यावर चव्हाण यांनी पंचनामा करताना विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कृषी सहाय्यक अधिकाऱ्यास सोबत घेणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले. विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व्यक्तिगतपणे केलेले पंचनामे ग्राह्य धरले जात नाहीत, असेही सांगितले.यावर पाटील यांनी कंपनीच्या व्यवस्थापकाकडे शेतकऱ्यांच्या समक्ष तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या समोरच पैशांच्या मागणीबाबत विचारणा केली. व्यवस्थापकाने उडवाउडवीची उत्तरे देताच संतप्त झालेल्या दिग्विजय पाटील यांनी त्याच्या श्रीमुखात भडकावत त्याच्यावर रीतसर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली होती.

प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पीकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केल्याच्या घटनेची माहिती वरिष्ठांना दिली आहे. पीकविमा पंचनाम्यासाठी पैसे मागितल्याच्या लेखी तक्रारी शेतकऱ्यांनी दिल्यास त्या पुढील कारवाईसाठी वरिष्ठांकडे पाठवू. पैशाची मागणी झाल्यास शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा. - इंद्रजित चव्हाण, तालुका कृषी अधिकारी इस्लामपूर.

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरCrime Newsगुन्हेगारी