आमणापूरला माशांच्या जाळ्यात गुरफटली मगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 04:23 IST2020-12-09T04:23:14+5:302020-12-09T04:23:14+5:30

भिलवडी : कोयनेच्या पाण्याचे आवर्तन लांबल्याने आमणापूर (ता. पलूस) येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. नदीचे पात्र कोरडे ...

The crocodile was caught in a fish net in Amanapur | आमणापूरला माशांच्या जाळ्यात गुरफटली मगर

आमणापूरला माशांच्या जाळ्यात गुरफटली मगर

भिलवडी : कोयनेच्या पाण्याचे आवर्तन लांबल्याने आमणापूर (ता. पलूस) येथील कृष्णा नदीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने मासेमारीचे जाळे मगरींच्या अंगाभोवती गुरफटत असल्याच्या घटना घडत आहेत.

आमणापूर ते धनगाव गावांदरम्यान कोंडार भागात नदीपात्रात मगरींचा वावर आहे. येथे मोठ्या पाच मगरींचा अधिवास आहे. नदीपात्र कोरडे पडल्याने मगरींचे दर्शन घडत आहे. याच परिसरात मासेमारी सुरू असते. मच्छिमारांनी पाण्यात टाकलेले माशांचे जाळे मगरींच्या अंगाभोवती गुरफटले जाते. त्या प्रचंड ताकदीचा वापर करून बाहेर पडताना कधी जाळे तुटते, तर कधी अंगाभोवती गुंडाळले जाते. पक्षी निरीक्षणासाठी गेलेले संदीप नाझरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. तो त्यांनी कॅमेऱ्यात कैद केला. सात फूट लांबीच्या मगरीभोवती जाळे अडकल्याचे निदर्शनास येत आहे. मगरी व पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास असणाऱ्या कोंडार परिसरात मासेमारी थांबविणे गरजेचे आहे.

फोटो - आमणापूर येथे जाळ्यात गुरफटलेली मगर.

Web Title: The crocodile was caught in a fish net in Amanapur