शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
2
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
3
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
4
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
5
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
6
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
7
भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
8
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
9
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
10
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
11
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
12
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
13
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?
14
दोस्त दोस्त ना रहा..!   भांडणातून घेतला जीव 
15
तरुणांभोवती ऑनलाइन गेमचा फास; टार्गेट पूर्ण न झाल्याने दाेघांची आत्महत्या
16
खासदारांना 'हेल्दी मेन्यू'द्वारे मिळणार 'ताकद'!
17
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

Sangli Crime: कुपवाडमध्ये गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने निर्घृण खून, शोधासाठी पथके रवाना

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 13:33 IST

खुनाचे कारण अस्पष्ट

कुपवाड : पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार श्रावणेशनाथ महावीर चौगुले (वय २९, रा. सध्या रा. सिद्धिविनायक पार्क, शिवशक्तीनगर कुपवाड, मूळ रा. भोसे, ता. मिरज) याचा रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास शहरातील शिवशक्तीनगरमध्ये भाड्याच्या खोलीत दोन मित्रांनी निर्घृण खून केला. याबाबतची फिर्याद चौगुले याच्या नातेवाइकांनी कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी सोफ्या व अशोक मोरे (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही) या दोन आरोपींविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा शोध सुरू आहे.पोलिसांनी दिलेली माहिती अशी, भोसे (ता. मिरज) येथील श्रावणेशनाथ चौगुले हा पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. तो गेल्या आठ महिन्यांपासून मिरज एमआयडीसीलगत असलेल्या शिवशक्तीनगरमध्ये सचिन माने यांच्या खोलीत भाड्याने एकटाच राहत होता. दोन मित्रांनी रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास अज्ञात कारणावरून श्रावणेशनाथ चौगुले याच्या छातीवर, डोक्याच्या पाठीमागे धारदार शस्त्राने वार करून खून केला.रविवारी रात्री उशिरा हा प्रकार निदर्शनास आला. कुपवाड पोलिसांना माहिती मिळताच सहायक निरीक्षक दीपक भांडवलकर आणि पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधीक्षक संदीप घुगे, पोलिस उपअधीक्षक प्रणिल गिल्डा, सांगलीतील स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे आणि पथकानेही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिस अधीक्षक घुगे यांनी संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांना सूचना केल्या. मृत चौगुले याच्या नातेवाईकांना हा प्रकार कळवताच त्यांनी घटनास्थळी भेट दिली. रात्री उशिरा फिर्याद नोंदवली.दोन पथके मागावरसोफ्या व अशोक या दोन आरोपींची नावे प्राथमिक तपासात निष्पन्न झाली आहेत. दोघांच्या शोधासाठी कुपवाड पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषणची दोन पथके रवाना झाली आहेत. मृत श्रावणेशनाथ चौगुले याच्या विरोधात जत आणि मिरज पोलिस ठाण्यांत गुन्हे दाखल आहेत.

खुनाचे कारण अस्पष्टश्रावणेशनाथ याच्या खुनाचे नेमके कारण समजू शकले नाही. संशयित दोघेजण त्याचे मित्र आहेत. दोघांना अटक केल्यानंतरच खुनाचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे पोलिस तपासाकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस